रात्रंदिन घुमती माग,
घाल वीण ,वस्त्र
काढ.
खटक खाड,सटक
फटक
सटक फटक ,खटक
खाड
(0)
निज नसे गावाला,
जो आला तो
रमला.
नाहि कुणी भुकेजून,
काम नाही करी
म्हणून,
स्वेद हाचि वेद
इथे,
धर्म,जात नाही
आड.
खटक खाड,सटक
फटक
सटक फटक ,खटक
खाड ( १)
सूत,कोन,बीम,धागा.
वही फणी,कांडी,तागा.
रोजी कुणा,कुणी
खंडून,
आठवड्यास कुणी,मांडून.
पीक,मिटर,जसा
पोत ,
तलम,कधी,भरड
जाड.
खटक खाड,सटक
फटक
सटक फटक ,खटक
खाड (२).
विविध,भिन्न,जनभाषा.
वस्त्रडाग,कधी इर्षा,
जनमन, धन वस्त्रमय
,
संप कधी, मंदि भय.
शित लहर जाई
सरून ,
होई पुन्हा तंत्र
वाढ.
खटक खाड,सटक
फटक
सटक फटक ,खटक
खाड (३).
No comments:
Post a Comment