झुकलेल्या झाडाच्या खाली
कोण सानुली निजली आहे ?
मधुस्वप्नांच्या दंवबिंदूंनी
तिची पापणी भिजली आहे!
लळा लागला झाडालाही
पानांची रोखीतसे सळसळ.
फुली फुलेना स्तब्ध उभा तो
येऊ न देई गंध नि दरवळ.
रे झाडा, हे व्रुक्षमहर्षी!
नकोस होऊ इतका हळवा.
वाटेवरती टपून बसल्या
रक्तपिपासू काही जळवा.
गोड गोजिरी परी तुझी रे
कुठवर तिजला तू रे पुरशील?
पंख फुटोनी गेल्यावर मग
उगाच अश्रु ढाळत झुरशील!
मोड तिच्या त्या मधुस्वप्नांना
पळसबनातील दावी निखारे.
तिरीप उन्हाची झेलून कैसी
गगनभरारी घेत पाखरे.
करवंदाच्या जाळीमधली
तिला खुडु दे आंबट गोडी.
चिक लागूदे वस्त्र फाटूदे
बोरीबाभळी करूदे खोडी.
उगा भलामण चंद्र चांदणे
नसते काही जैसे दिसते.
अनुभवल्याविण ज्ञान पुस्तकी
मोरपिसापरी नुसते बसते.
अग्नितून पोलाद घडावे
तैसा तीज आकार मिळावा.
तिच्या तरुचा तुझ्या अंगणी
नित्य सुगंधी बहर गळावा.
.
संतोष
Thanks आनंददादा
ReplyDeleteNice work...keep it up
ReplyDeleteएकदम सही !!
ReplyDeleteमस्त मस्त ...
ReplyDelete