Sunday, November 21, 2021

दिवाली

 

गतवर्षोंका किल्मिष हरने,

नवोत्साह मन मन मे भरने,

तेजोमय घर घर को करने,

*आज दिवाली आयी है!...*


*आज दिवाली आयी है।*


आंगन आंगन चांद सितारे 

झिलमिल करते प्यारे प्यारे

रात को भी होते उजियारे,

मंगल सी ऋत आयी है!


*आज दिवाली आयी है।*


त्योंहारोंकी ये महारानी,

इंद्र कुबेर भी भरते पानी,

परंपरा ये बहुत पुरानी,

शुभलक्ष्मी मुसकायी है!


*आज दिवाली आयी है।*


लक्ष लक्ष दिपक है जलते 

नेत्रकमल सबके है खिलते

आशा के मोती है पलते

लहर खुशी की छायी है!


*आज दिवाली आयी है।*


सम्मिलीत हो हर कोई अपना

सच हो संजोया हर सपना

हर क्षण मंगल हो अब अपना

मिलन की बेला आयी है!


*आज दिवाली आयी है।*


मिष्टान्नोंसे भरी है थाली,

कोई हाथ न जाये खाली

चहूं और फैले खुशहाली

उत्सव की घडी आयी है!


*आज दिवाली आयी है।*


*आज दिवाली आयी है।*


                                   .🍃संतोष

उरला नाही..


निसर्ग कविता सहज स्फुरावी 

निसर्ग तसला उरला नाही.


गच्च दाटल्या जलदांमाजी

दंश विजेचा उरला नाही.


कडकड होते ,गडगड होते

पाऊस सुद्धा पडतो रिमझिम.


परंतु पाचूच्या गात्रांवर

गोड शहारा उरला नाही.


काळा कापूस पिंजत वारा,

खाली नाचरा मोर पिसारा.


पुस्तकातल्या या गाण्यांचा

स्पर्श निरागस उरला नाही.


नवीन गोष्टी,नवीन गाणी,

नव्या नव्याची सतत मागणी,


रुजल्या बीजांचाही आता

तसा सोहळा उरला नाही.


अंगी अपुल्या आखलेलेपण

तयार घोडा,त्वरा सदाची.


निसर्ग सोडा जीव ही अपुला

आता सोवळा उरला नाही.


कबूल शतदा तरी पुन्हा हे

स्वप्न पोपटी फुलारते,पण,


मन हे भोळे म्हणे स्वतःला

शब्द कोवळा उरला नाही.


जुने जूनपण,नवीन नखरे 

या कात्रीतच जीवपाखरे,


कसे उडावे या पंखांतच

जोम पूर्वीचा उरला नाही.


निरर्थकातून अर्थ शोधती

अशा गावचा मी रहिवासी,


घडून गेले बरे नि वाईट,

खेद तयाचा उरला नाही.

    

                                  .🍃संतोष

Monday, September 27, 2021

उखाणे


घरंदाज काही मनीचे उखाणे

पडे प्रश्न त्या उत्तराला पुन्हा,

नसे गूढता,स्पष्ट डोळ्यात प्रतिमा,

तरी आत्मविश्वास होई उणा,


तयां माझिया दुष्टचक्रास भेदून,

भूमीतुनी रोप येते नवे.

आणि शब्दकोंबातुनि ये पिसारा,

जसे सांजवेळी उजळते दिवे.


तरारुन येते कधी कल्पनेचे

तरु त्यास शाखा नव्याने फुटाव्या,

मुक्या,बोलक्या काव्यसंकेतकलिका,

फुलोनी हळु देठदेही उठाव्या 


सलांच्या व्रणांची जुनी बोच शमुनि,

खुळ्या वेदना अंतरीच्या मिटाव्या.

तळ्याच्या तळी पोहणाऱ्या मनाच्या

खुणा जाणिवेच्या नभाला पटाव्या.


                                .🍃संतोष

साळुंकी सावळी


साळुंकी सावळी,आली ही अंगणी,

पाहसी रोखुनि,काय तुझ्या मनी?


पीत ही कोंदणे,डोळियांचे मणी

मैना तू माझी गं,सखी साजणी!


भिरीभिरी पाहसी,चालतां डोलसी,

कळेनाच गं मला,काय जे बोलसी!


" राघू कोठेतरी,मी इथे वावरी,

बोलती लोक हे,गोष्टी नानापरी!


चिमुकल्या मम जगी,मी सुखे नांदते.

मुक्त वायूंवरी,विहरतो तो तिथे.


'मैना' संबोधनी सुप्त जी भावना,

छळतसे मानसी,तीच ही वंचना "


सोड ही खंत गे,का उगी वाहसि?

लोक हे बहुमुखी,खिन्न का राहसि?


ये पुन्हा सहज तू,माझिया अंगणी,

साळुंके साजणी,खेळुया रंगुनी!


                               .🍃संतोष

माझी गज़ल


माझिया कवितेस माझे भान आहे,

तीच आहे थोरली,मी सान आहे.


बीज होते आत त्याचे रोप झाले

व्यर्थ बाकीचे तसे गुणगान आहे.


झाड माझे पोसले ती हीच धारा,

मूळ गेले खोल,हिरवे पान आहे.


सोडले मी मोजणे माझ्या कळ्यांचे,

अंगणी माझ्या फुलांचे रान आहे.


षड्ज आहे लागलेला स्थिर माझा,

रोमरोमी ही विजेची तान आहे.


स्वाभिमानी अन् ईमानी रक्त माझे,

हिंडताना ताठ माझी मान आहे.


माझिया भाषेस सुटतो रोज पान्हा,

रोज मजला अम्रुताचे पान आहे.


प्रार्थनेची टाळ वाजे आत माझ्या,

माझिया झोळीत त्याचे दान आहे.


                              .🍃संतोष

Friday, September 24, 2021

काज़ल


काज़ल की रेखा के क्या मायने है,

आओ समझनेकी कोशिश करे!


घर की जो चौखट! वैसे ही काज़ल,

नैनोंके घरकी हिफा़जत करे।


आँखोंमे छलके जो गम का समंदर

टकराये काज़ल,किनारा बने।


मूँदी जो अँखिया तो सपनोंकी सखियां

आयी टहलने,सहारा बने।


नजरोंमे बिजली,

तो काज़ल घटा है!

नजरें है रंगीं तो 

काज़ल छटा है!


नज़र को नज़र 

करने बैठे दिवाने! 

कातिल है काज़ल,

परदा हटा है!..


काज़ल का टिका जो 

नन्हेसे बालक के, 

गालोंपे बैठा सुनहरा लगे।


नजरें बला की,

वो टाले,सँभाले,

आँखोमे मिठासा सपना जगे।


नैना है मोती तो धागा है काज़ल

नैना है ज्योती तो काज़ल दिया है।


नयनोंके जल से है काज़ल का रिश्ता,

जितना पुराना उतना नया है।


                                   .🍃संतोष

अई सुखमनि...

अई सुखमनि तुम 

दुखमनि के संग 

खेलन जात कहाँ?


पिछवाडे है,

काल का कुआँ,

खेलन जात वहाँ.


सुखमनि गिर गयी 

कुएँभीतर,

दुखमनि रोये खूब,


कहे संदेसा,

काल का आओ

ले जाओ मेहबूब.


अब भोले मन 

क्यूँ पछताना,

रहले दुखमनि संग,


सुखमनि तो है 

इक परछाई

सच जाने श्रीरंग.


गुरुने सिंचा 

काल का पानी

उसमे तिरथ न्हाते


सच्चित्सुख के 

द्वार खडा मै,

गीत उसी के गाते.


                                 .🍃संतोष

उडतें परिंदे


उडतें परिंदे जो घूमे गगनमे,

क्या जान पायेंगे पिंजडे का गम!


दो वक्त़ रोटी!बेटा या बेटी!

दाढी या चोटी,में अटके है हम।...


अटके है लेकिन भटके नहीं है,

रिश्ते पुराने वो झटके नहीं है।


पक्के है हम कच्चे मटके नहीं है।

है खा़मियाँ !मुँह तो लटके नही है!


कुछ तो है हम मे भी दम !


उडतें परिंदे जो घुमे गगन में,

क्या जान पायेंगे कैसे है हम?....


परदे बहुत है,शर्ते बहुत है,

लेकिन मुहब्ब़त भी करते बहुत है!


बोली अलग है,डोली अलग है,

हर ईक काफिलेकी टोली अलग है।


लेकिन ये खु़षबु फि़जां मे जो फैली,

ये मिट्टी है सबकी,सबका फ़लक है।


सुलगी सी आशा ,सर्जन की भाषा,

कल का संदेशा, है पुख्त़ा अंदेशा।


माला विजय की ,है राह तकती

काटोंसे लडकरभी जितेंगे हम।


उडतें परिंदे जो घुमे गगन में,

वैसे ही मिलकरके घुमेंगे हम!..


                                    .🍃संतोष

चमन


अल्फा़ज महके!दिल को तसल्ली

वरना तो बागोंमे सूखे पडे है!


कागज के फूलोंका फैला गुलिस्तां

पेडोंपे छत्तेभी रुखे पडे है.


क्या ये शिकायत?हिमाक़त हमारी!

फहरे तरक्की का नायाब परचम!


लेकिन वो चिडीयाँ,वो जंगल की राहें?

आमोंके पत्तोंमे ,कोयल का पंचम?


सुनसान सारे,बंजर से परबत

कुछ घास,पौधे !वो भी झुलसते!


नुकीले वो लोहे के नाखून जिनके

करे खोख़ला,हाथ तनमें है धँसते


कुद़रत ने फुरसत से जो है तराशे

बने ढेर मिट्टी के,पत्थर उधसते.


उसपें भी कमजोर छत के सहारे

इकट्ठे कही पर है मजदूर बसते.


क्या ये उदासी? या मातम के नग़मे,

गिला समझिये या सलाह समझिये!


लेकिन कु़सुरवार अगले सदी के,

हम सब है का़तिल,जरुर समझिये!


नहीं आयेंगे जो हुएँ खत्म गुलशन,

नहीं आयेंगे वो गुलीस्ते-चमन!


लेकिन बचा है उसे तो सम्हांले,

गवाह खुदका खुदको है

अपना ही मन!

                                  .🍃संतोष

फर्क


खुषबु़,महक और बू मे है क्या फर्क,

बतलाये कोई तो मानेंगे हम!


करतूत,क्रिया,करनी मे क्या फर्क,

सिखलाये कोई तो जानेंगे हम।


मतलब मे डूबे हुए रस के प्याले

ऐसे है अल्फ़ाज झुमे हुएँ,


ईनको पकडकर,सिखलाये कोई,

धरती पें लाये तो मानेंगे हम!


दो लफ्ज़ चिपके,ईक बैठा छिपके

उसमेसे किसको बुलायेंगे हम?


ईन अक्षरोंकी है दुनिया ही पागल

करे जो सयाना,तो मानेंगे हम!


छोडो ये जिद़ की समझेंगे सब कुछ,

समझाबुझाने से हासिल है क्या?


बहते ख़यालात,खिलते है नग़मे,

खुषरंग दुनिया है,गायेंगे हम!


                                    .🍃संतोष

निशेची स्मरणचित्रे

 

उधळलेले लक्ष मोती,

उजळलेल्या शुभ्र ज्योती,

त्यात शोभे चंद्र राजस

फाकले नवतेज भंवती.


चुरडलेला मोतीचारा

पसरला गगनावरी,

काजळाची दाट माया

रात्रीच्या ह्रुदयांतरी!


रोहीणी कोनात हासे,

क्रुत्तिका सुमगुच्छ भासे.

म्रुग पळे त्यां व्याध त्रासे,

क्षीण ध्रुव त्यां क्षितिज ग्रासे.


दूर तापस तो अगस्ती

दक्षिणेला एकटा,

केवढा,नभ व्यापुनी हा

व्रुश्चिकेचा शेपटा.


पाच बोटे उमटलेली!

हस्त चित्रा दाविते.

तूळ राशीचा तराजू,

स्वाती हाती वाहते.


सावळ्या डोहात रजनी,

विश्व निद्रा घेत सदनी.

पांघरे अंधार अवनी,

गगनीचे प्रतिबिंब नयनी.


शांतता गूढरम्य आहे,

कौमुदीही सौम्य आहे.

मौन सोडी रे मना तुज,

आज सारे क्षम्य आहे.


या निशेची स्मरणचित्रे 

काढुनी मी पाहतो.

अन् पुन्हां या चांदण्याच्या

नवप्रपाती नाहतो!


                                   .🍃संतोष

Wednesday, September 22, 2021

कल(१)

जख्म़ सिने मे दफन,

करके जिये उनकी फ़तेह।


जख्म़ सिनेसे लगाये हुएँ

क्यू्ँ बैठे हो?


अश्क जो पी गये वो,

पा सके मंझील अपनी।


अश्क सस्ते नहीं,

क्यूँ यूँ ही बहा बैठे हो!


बात तनहाईं से करते हूएँ,

वो मौज मे है।


अकेलेपन से क्यूँ तुम 

रुठे हुएँ बैठे हो?


अरे भोले मेरे मन 

तुझसे ही मै बात करू,


है जो पल उसमे रहो,

कल मे क्यूँ बैठे हो?

चला काळोखाच्या बुडी...

चला काळोखाच्या बुडी,

पुन्हां चूड लावू आता!

पुरे परप्रकाशीत,

भावी उजेडाच्या बाता!


म्हणे क्षितिज फाकेल,

पूर्व दिशा लकाकेल,

त्याला अर्घ्य देण्यास्तव

जळी ओंजळ वाकेल!


धीर सुटे,डोळा मिटे

स्वप्न अधांतरी उठे,

सार्या बीजांचीच पीठे

उद्या उगवावा कुठे?


दाट साठलेली हवा,

कोठे चुकार काजवा,

नको पणती नी दिवा,

आधी पलिते पेटवा!


कोणी ओरडतो क्रांती

कोणी आळवितो शांती

दोन वेळेची ज्या भ्रांती

त्याला विचारांच्या वांंती.


हवी खिशामधे ऊब?

तिला मान्यतेची डूब?

खडीसाखरेची जीभ?

सोडू लबाड हा लाभ!


एक एक ये मशाल,

करू मिळूनिया चाल

काढू काळोखाची साल

होवो दिवाळीच आता!...


चला काळोखाच्या बुडी,

पुन्हां चूड लावू आता!


                                  .🍃संतोष

वसे


कधी खूप पूर्वी इथे माड होते

कधी पावसाळ्यात डोलायचे.


कधी मोकळे काही शेजार होते,

मनांपासुनी काही बोलायचे.


कधी खूप पूर्वी इथे झाड होते,

अतां राहिल्या फक्त भुंड्या खुणा


कधी खूप पूर्वी इथे दार होते,

अतां फक्त गेटातल्या सूचना.


कधी खूप पूर्वी इथे लोक होते

गवाक्षांतुनी नेत्र भेटायचे.


अतां उंच त्यांच्या सभोति मनोरे,

न मी जायचे अन् कुणी यायचे!


कधी खूप पूर्वी इथे वाहणाऱ्या,

सुगंधांतुनी काही पोचायचे.


हवाबंद आता तयांना पहारे,

निरोपातुनी फक्त कळवायचे.


कधी खूप पूर्वी इथे श्वास होते,

उरी ध्यास आणीक विश्वास होते.


अतां गोड वार्ता आभासी जगाच्या

मुखवट्यातुनि फक्त खुणवायचे.


नव्हे ही निराशा,नव्हे स्वप्नभाषा,

जुने जायचे अन् नवे यायचे!


परंतु कधी खूप पुर्वी जुन्यांनी

वसे पेरले तेच हरवायचे!


                                    .🍃संतोष

Sunday, September 19, 2021

तोरणे

 तोरणे लावा सख्यांनो

आज माझा क्रुष्ण येतो,


विरहवीणा शांत करण्या

बांसुरीचा नाद येतो.


हांसता का बालिकांनो

क्रुष्ण काळा हा म्हणोनि?


देखणा,लावण्यखाणी

राजसांचा राव येतो.


मोकळ्या केसांत माझ्या,

दोन बकुळीची फुले.


नीलकमळांचा तयांना

माळण्या श्रुंगार येतो.


जीर्ण माझे कांबळे

अन् चंद्रमौळी झोपडी.


भरजरी पितांबराचा

मोरपंखी साज येतो.


कुरुप कुब्जा,सुरुप राधा

राजकन्या रुक्मिणी!


भावना जो फक्त पाही

प्रेमळांचा प्राण येतो.


क्षुद्र मी कण मातीचा

व्याकुळल्या वाटेवरी


सावळा पदस्पर्श करण्या

सावळा घनश्याम येतो.


                                   .🍃संतोष

लेखणी


देखणी ती लेखणी 

जी दाविते पैलातले.


शब्द होती सजीव आणि,

बोलती ह्रदयातले.


लाल काळ्या आईच्या,

गर्भातला हुंकार होते.


अन् शिवाच्या मंदिरातील

सोवळा ओंकार होते.


पूर्वजांच्या थोरवी चा

सार्थ जी अभिमान होते.


नवनव्या ज्या कल्पना,

त्यातील कंवळे पान होते.


लाल तांबूस केशरी,

अन् नीलजांभूळ शेंदरी,


या नभाच्या कागदावर

कुंचल्यांचे रान होते.


चिमुकल्या चिमण्या जीवांचे

मुग्ध बालांच्या श्रवांचे,


कोकिळेच्या काळजातील

आर्त ती स्वरगान होते.


लेखणी झरते कधी

अश्रूंसवे गालावरी,


राबत्या हातांसवे,

ती ओघळे निढळावरी.


लेखणी ती आग ओकित

झुंजते सीमेवरी,


वा विठूच्या वाळवंटी,

नाचते भीमेवरी.


शब्दप्रसवा लेखणीची 

धार ही तलवारशी.


थेट घाली घाव,नाही

फिकीर तिजला फारशी.


व्योमव्यापी ती तथापि,

सुक्ष्म रेणुरेणुची.


पंडीतांच्या पंगतीची,

गोकुळीच्या वेणुची.


अक्षरांच्या मोतियांना 

गुंफुनी शब्दांतरी,


लेखणी ही माळते 

ही मालिका काव्यांतरी!


                                 .🍃संतोष

नभाच्या समुद्री

 नभाच्या समुद्री किती अभ्रलाटा,

उफाळून ये काजळाचे खळे.


निळासावळा डोह हा खोल जाई,

अकस्मात झाकोळ हा सांकळे!


आता ती प्रतिक्षा,क्षणांची युगाब्दे,

टपोरे नवे थेंब जन्मायचे.


घनांचे घुमावे वरी चौघडे अन्

सडे मुक्त मोत्यांपरी यायचे.


फुले अत्तराचा मळा भोवताली,

जळी प्रुथ्वी आकाश मिसळायचे.


घडे नाहणे,सोवळी सर्व स्रुष्टी

विहंगापरि स्वैर विहरायचे.


जळाच्या पखाली किती रिक्त होती,

थके वाहुनी वायु सैलावला.


खुले नेत्रभिंगांतरी बाहुली ही,

पिते गारवा दूर फैलावला!


नभाची निळाई दिसू लागते अन्

करी किलकिले नेत्र हा भास्कर,


अशी शेवटी शांतता त्रुप्त येता,

मिटे मी,मनाचे पसरले पर!


                                .🍃संतोष

तो व ती


*तो* चे *ती* शी होते भांडण,

असेल किंवा नसेल कारण!


खोड दुज्याची पक्की ठाऊक,

जुन्या चुकांच्या घटना तारण!


तुरा शिरावर तो मात्रेचा

*तो* चा तोरा *ती* ला टोचे.


*ती* ची वळली वर वेलांटी

अबोल *ती* त्या *तो* ला बोचे.


तर्हेवाईका जैसे *तो* चे 

असे वागणे भलते बाई!


घुमेपणाने *ती* का राही?

कडी मनाची उघडत नाही!.....


आणि लागते चाहूल *त्याची*,

*तो* की *ती* हे माहित नाही!


गोड शिरशिरी दोघांनाही,

तोष *तो* व *ती* व्यापून वाही!


*ती* च्या अस्तीत्वा ला आता

*तो* चा प्रेमळ स्निग्ध पहारा,


मिटते भांडण आता प्रतिक्षा,

*तो*,*ती* यांचा वितळे पारा!


                                    .🍃संतोष

स्वप्न

 

ते पेंगुळलेले स्वप्न अचानक जागे!

चाहूल कुणाच्या अंगाईची मागे?


म्रुगत्रुष्णेची का लाट आतूनी आली?

आभासविषाचा शाप लोंबतो खाली!


मी दडवून ठेवी आरश्यातला चेहरा

अन् दडपून देई चलनी चावट मोहरा.


ही सत्य असत्यासवें चालली होडी,

मध्यात सोडूनी गेला की नावाडी!


हा गाव धुक्याचा,नजरा पडद्यामागे

हा बोल मुक्याचा,आशय केवळ धागे.


ते जुळवून द्यावे ऐसी प्रज्ञा नाही!

हे भलते कोडे अवघड तज्ञांनाही.


हा सवाल फसवा उत्तर याचे नाही

जो हात अडकला जंजाळातच राही.


घ्या मिटुनि डोळे!

खोल खोल घ्या श्वास!

जे दिसते वास्तव!अनंत पदरी भास.


जा पुन्हा रंगुनी मनां स्वप्नरंगात,

जोवरी पडे नच तो काळाचा हात.


                                 .🍃संतोष

श्री गणराय

 छुम छुम छनकतें है नुपुर पद में

सिर जो हिलाये वो अपने ही मद में!


आँखे दया के समुंदर के जैसी,

लड्डू घुले है क्रुपा की शहद में.


मोदक में भक्ती है, परशु मे सख्तीं

चारों भुजाओंमे माँ की है शक्ती.


मूषक में स्थलकाल आदि समायें

यहाँ विघ्नव्याधी,आ ही न सकती.


बडे सिंप जैसे हे दो कान जिनके,

छोटीसी अर्जी भी सुनते जरूर.


बडा पेट है जिसमे सब कुछ समाये,

गलती छिपाते, हमारे हुजूर!


शिव और शिवानी के बालक है

लेकिन, ब्रह्मांड खुद में समायें हुएँ है,


वेदोंसहित शास्त्रकारोंने इनके,

अगणित स्तवन गीत गायें हुएँ है।


माथें तिलक और लालस है काया,

सरल शुंड,निचे दमकते रदन दो!


कुंकुमसीं फूलोंकी माला गलेमे

सिद्धी न रिद्धी!चरण में शरण दों!


करे रोज पूजा,हो मंगल सुमंगल,

हर दिन नयां,प्रेमभक्ती भरा हो.


बुद्धी के दाता सुबुद्धी हमे दो,

संकट मिटे,स्वस्थ सारी धरा हो।


                                    .🍃संतोष

ओळखा पाहू

(१)

खंवलेल्या खोबऱ्यासोबत

गूळ आला शिजून,

एकजीव सारण झालं

मुरलं पाकात भिजून.


तांदळाच्या उकडीची

पांढरीशुभ्र पारी,

पुढील सारं कसबीचं

पाहिजे तयारी!


पारीच्या पोटामध्ये

सारण भर नीट

चिमूटचुण्या पाडून काठ

अलगद वर मिट.


अंगभर वाफ घेऊन

नाही पाहिजे हसला,

मग मात्र जाऊन थेट

बाप्पापुढे बसला.


नारळाचं दूध गोड

वरती साजूक तूप

नैवेद्याच्या ताटामध्ये

याचंच अप्रूप.


                                    .🍃संतोष


ओळखा पाहू:-


वाटून घाटून मसाला,

केली खमंग आमटी.


कणीक मळून जाडसर

लाटी लाटली मोठी.


आडव्या उभ्या सरी पाडून

सुट्या पाळ्या काढा.


आमटीत सोडून शिजवा मस्त,

गरम गरम वाढा.


वरतून जरा तूप आणि

लिंबू पिळा ताजा,


नेहमीच्या स्वयंपाकाला

आज थोडी रजा!


                                .🍃संतोष


ओळखा पाहू:-


कांद्याच्या पाकळ्यांना

चोळा तिखटमीठ,

चुरडलेला ओवा,घोळा 

घालून बेसन पीठ.


कडक तापल्या तेलात

सोडा गोळे हळू,

वास खमंग सुटताच,

लागेल सर्वां कळू.


तळलेली मिरची

सोबतीला बरी,

वाफाळलेला चहा,

आणि पावसाच्या सरी!


                                   .🍃संतोष

ओळखा पाहू:-


कुरकुरीत चिरमुरे,

चुरचुरीत फोडणी.

शेंगदाणे,कढिपत्ता

अशी सर्व जोडणी.


तिखटमीठ पिठीसाखर

जमली चव मस्त,

कांदा,लिंबू,कोथिंबीर

घालून करू फस्त!


खाऊ खाऊन खुसखुशीत

बाळ आला खुशीत!

आजी म्हणे,'भरते डबा,

काढून देते बशीत!'


                                    .🍃संतोष


सुईबाई


सुईबाई शिरल्या

शर्टाच्या धाग्यात!

नेढ्यात दोरा ,

ओवून त्राग्यात!


आतबाहेर,बाहेर आत 

करून काही वेळ,

तुटलेल्या बटणाचा

काजेशी मेळ!


काय बाई माझ्या

कामाच्या वाटा!

काढायचा आहे 

पायातला काटा!


घालून पक्की गाठ,

फिरवून आपली पाठ,

म्हणाल्या आता "येते",

पडेल अवचित गाठ!..


दाभणताई गोधडीत 

अश्श्या काय घुसल्या,

पाच टीपा एकदम

घालून स्वस्थ बसल्या.


ठिगळ ठिगळ जोडून

गोधडीत ऊब भरीन

म्हणतात,अंग मोडून 

शिवण टांचण करीन...


राजसबाळ्या क्रोशाच्या

सुबक लांब सुया,

स्वेटर,मफलर लोकरकाम!

थंडी आली बया!


बाळासाठी पायमोजे,

किंवा छान टोपी,

मऊमऊ घालून कसं

बाळ जाईल झोपी...


अस्सा आमचा सुई वंश

जन्म शिवण्यासाठी,

लागली गरज हाक मारा,

सज्ज सेवेसाठी!


                                   .🍃संतोष

Thursday, August 19, 2021

मुकाम


शुद्ध सत्य का,इस दुनिया मे 

बहुत कठिन है मिलना!

बिना मिलावट सोने का भी 

बना न सकते गहना!


वास्तव है ये,झूठ नहीं,

आकार हमे है भाता,

रागस्वरोंको समझाने मे,

शब्द काम मे आता.


निर्गुण उर्जा चलन वलन मे 

परिवर्तित हो जाती,

उसी समय सबको दिखती है 

वरना छुप सी जाती.


रुपक की जब चादर ओढे,

तत्त्व सामने आता,

वही पुराणोंकी काव्योंमे 

कवी चांव से गाता.


राम झूठ है? क्रुष्ण झूँठ है? 

झूँठ है फिर सब दुनिया!

निराकार को बिना जानके,

बेंचे वो तो बनिया!


सभी सिद्धताओंसे परे है,

उनका अब क्या कहना?

मूढमती,जो प्रमाण माँगे, 

भूल चूका है बहना.


अंतर्हेतू क्या है इस पर 

सब कुछ निर्भर भाई!

शुद्ध वस्तू का अंश सगुण मे

बात यही दोहराईं.


मूर्त भाव आकार लिये

जब करवाये कुछ लीला!

प्रेमकी गंगा उठे उमडकर 

भावभक्ती का मेला!


यही सगुण है ,प्रथम परिक्षा

तत्व बाद मे आता!

तत् त्वम् आदि,महावाक्य तब 

गुरुमुख से कहलाता!


तब तक थोडी करे तितिक्षा

श्रद्धा ना झूँठलाना.

मार्ग भिन्न है,लेकिन हम को

एक मुकाम है पाना।


                                   .🍃संतोष

सवाल


आरजू है क्या तेरी अब 

बस मुझे तू बोल दे!

मेरे मन तू ख्वाईंशोंके

द्वार सब बस खोल दे!


चांद दूँ या चांदनी?

झील या मंदाकिनी?

फूल के बागान दूँ या

आसमाँ से दामिनी?


चाहिये जेवर चमकते?

या वो मोती जो दमकते?

इत्र के बादल बरसते?

पंछी मधुस्वर मे चहकते?


नीलिमा नीले नयन की

रक्तिमा पहले किरनकी

पूर्णिमा खिलती, शरदकी

स्वर्णिमा नवअरुणरथ की


क्या दूँ बोलो,मन,टटोलो

मौन का ताला तो खोलो!


त्रुप्ती आये जिस विषय से

फिर न माँगे और दूजाँ,

दो मुझे तुम गर है देना,

फिर करुँ मै उसकी पूजा!


सुजन सुनियें और कहियें

क्या है वह?और कहाँ मिलेगा?

ऋण है मनका मन को देना

क्या पता कब दिन ढलेगा!


                                 .🍃संतोष

त्या कुसुंबी कोवळ्या..

त्या कुसुंबी कोवळ्या,

कुसुमांस केव्हां नीज आली?

डोलत्या डाळिंबरंगी 

कोषिकांची शेज झाली.


वाहत्या वाऱ्यात पारा,

पाचूच्या रानी पळाला,

शांत शितल जलतरंगी,

डुंबुनी वलयी मिळाला.


मखमली मार्गात हिरव्या, 

पायवाटा गुप्त झाल्या,

गोड गंधांच्या नशेने,

गुंगुनि का सुप्त झाल्या?


किरमिजी जांभूळनिळा कां,

नभतळ्याचा काठ झाला?

अन् अचानक अभ्रभरल्या

अम्रुताचा माठ झाला!


न्हाण आले नवरसांना,

उमलुनी उन्मेष आला.

मग म्हणाले झाड ओले,

'मज मुलां,संतोष झाला.'


                              .🍃संतोष

Monday, August 2, 2021

मी

कालचा मी काल गेला,

आजचा येथेच मी!


का उद्याच्या हाती मी 

जो,होउ त्यासाठी श्रमी?


चाललेला ताल नाही

द्रुत करोनी फायदा.


मोकळ्या जागा भराया

अन् नको तो कायदा.


षड्ज पंचम स्वरपटावर

चित्र निर्गुण उमटते,


उमटते,मिटते तयातच

अंती काही प्रगटते.


हाती उरले जे स्म्रुतींच्या,

शुभ्र काही कवडसे.


मार्गदर्शन तेच करतील,

अनुभवांचे आरसे.


शब्द घोटीव,अर्थ सुकला

नाही ऐसा मामला,


रस गळूदे,शुद्ध आता

काळ आहे थांबला!


                                    .🍃संतोष

मैत्री

 करडा कबरु ,गोरा गबरु

दोघे जानी दोस्त खरोखर.


गळ्यात घालून गळे हिंडती,

जना भासती जणू सहोदर.


कबरूला गबरूचा हेवा

कधीच नव्हता स्वप्नीसुद्धा!


गबरुच्याही मनात शिरला 

नाही भलतासलता मुद्दा!


मत्सर काविळ झालेल्यांनी,

चहुबाजुंनी बोंब उठविली,


अन् दोघांच्या मैत्रीमध्ये 

कायमची ही ठिणगी पडली.


                                  .🍃संतोष

नभ आणि मेघ(रुपक)

मेघ सावळा सावळा,

नभा लावतसे लळा,

रंग टाकुनिया निळा,

नभां चढे क्रुष्णकळा!


कसे पुंजावले मेघ

तोय आकंठ पिऊन,

बोट लागता वार्याचे

आले खालती झरून.


मेघ दूतरुपे आला 

त्याचा ओलेता निरोप,

गंध पळे रानोमाळ,

गेली वार्ता आपोआप.


जणू अमुर्तसे चित्र,

नभी मेघकुंचल्याचे.

काही आक्रुत्या,आभास,

मू्र्त सजीव झाल्याचे.


छाया क्रुष्णपदराची

आत झरे मेघस्तन्य

पाजी नभ धरतीला

ऐसे वात्सल्य अनन्य.


नाही फिटणारे ऋण,

अनुबंध पुरातन.

द्वैत नभजलदांचे,

धाले एकत्वे न्हाऊन.


                                 .🍃संतोष

बारिश बोले बूंद की बोली

 बारिश बोले बुंद की बोली, 

धूप से खेले आंखमिचौली.


शोर मचाती,संग घुमड घन 

शीतल झरवन,कुछ मनभावन.


पतियनको देती हैं ताली

मोतियनसे दमकत है डाली. 


छमकत छुम छुम,

झील की जल पर,


फिसलत,गिरकर,

डगर डगर पर.


ठहरत मुडकर, 

नहर नहर पर.


थिरकत धिं धिं,

जलकी प्रतल पर.


बारिश बोले बूंद की बोली

फिर यादोंने पलके खोली।


कुछ सुलझीसी,कुछ पहचानी,

कुछ उलझीसी,कुछ अंजानी!


बारिश बोले बूंद की बोली...


बारिश बोले बूंद की बोली...


                                    .🍃संतोष

Sunday, August 1, 2021

बारिश, फिरसे!


फिरसे बारिश,सावन फिरसे !

फिरसे घटासे,मोती बरसे!


वही पुरानी,और पहचानी, 

इत्र हवा मे घुली किधरसे!


नया है क्या फिर?

सब तो वही है!

कहे जो कोई,यूँ तो सही है!..


शिशिरगलित सब पर्ण पुष्प ज्यों,

नवोत्साह से पुनः मुकुलित हो,


सुप्तभाव मे निद्रा लेते, 

तृण के बीज पुनःआकुलित हो!


राग,ताल भी वही पुरातन,

उपज मिले तो नवसर्जित हो,


कणस्वर नूतन,नयी गुँजाईश

विसंवाद सब परिवर्जित हो!..


जैसे सारी बेलरिया भी 

नये ऋतू मे फिर ऋतुमती हो,


जैसे भव की जननामृती मे

उसी चिरंतन की नित स्मृती हो!


ऋतूचक्रोंकी पुनरावृती मे

किसी काव्यकी यूँ अनुभुती हो...



ऐसे अनुभव देती बारिश,

गौर से देखे,सबको गुजारिश!


गिरता पानी सिर्फ नही है,

नया नजरियाँ,नयी है बारिश!


                                   .🍃संतोष

निरांजनी कळ्यांनो...

 बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचं आत्मचरित्र, समिधा नुकतंच वाचनात आलं.

अफाट अनुभवांनी भारलेलं जीवन.


एका ओळीत मांडायचा प्रयत्न केला तर,

बाबांचे व्यक्तिमत्त्व आकाशाला स्पर्श करणार्या विशाल व्रुक्षासारखं मानलं तर साधनाताई या त्या व्रुक्षाच्या न दिसणार्या जमिनीत स्वतःला गाडून घेतलेल्या मुळ्या होत.

त्या स्वतः अत्यंत आस्तिक होत्या,मात्र विचारांनी सुधारक होत्या.

आनंदवनातील सद्यपरिस्थिती यावर आपण मत व्यक्त करणं औद्धत्याचं होईल परंतु कुटुंबाला एकत्र ठेवणारा साधनाताईंचा आईपणाचा धागा तुटल्यामुळे तर असं झालं नसेल असं वाटून गेलंच!

खालील काव्यरचना  करताना पुस्तकाचा, साधनाताई यांच्या कार्याचा स्वर आत मनात कुठेतरी निनादत होता.

आणि मला समिधा यापेक्षा निरांजनच आठवलं त्यांना पाहून, समिधा जळून जाते, निरांजन शांत तेवत राहते, गाजावाजा न करता...

ईतकी प्रस्तावना त्यासाठी...

( स्वप्नातल्या कळ्यांनो आणि समईच्या शुभ्र कळ्या यातील रुपक घेतले आहे, आशय मात्र वेगळा आहे)

–--------------------///--------------///-------------------------


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा!

होईल गर्द गहिरा काळोख दाट जेव्हां!


माझ्याकडे फुलांचा कैवल्यघोस आहे

किरणांतल्या झुल्यांचा त्यांनाच सोस आहे.


मुक्तांबरी निळ्याचा हा पांघरून शेला,

जो आर्त गीत गातो,त्याचीच ओढ जीवा,


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा!   (१)


सौंदर्य सोनपंखी सुखवर्ख माखलेले,

तरीही तयास वेढे, सारेच आखलेले!


कुरवाळुनी स्वतःला जे गुंतले जरासे

पल्ला सुदूर गेला,उलटून सर्व फासे.


शास्त्रार्थ घोकणारे पांडित्य शुष्क होता,

उधळा रसाळतेचा सद्भक्तीयुक्त ठेवा!


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! (२)


बोलायवास काही गेलो खरे जगाला,

होताच पाठमोरा गलका अमाप झाला.


पटले न काही तरीही,केले उगाच जेव्हां,

त्या छद्मवर्तनाचा मजलाच भार झाला.


आता उगेपणाला वैराग्य नाव द्यावे?

अथवा निलाजरे हे डोळे उधार घ्यावे?


काहीच बोध नाही,तरीही करू वहाव्वा?


निरांजनी कळ्यांनो फुलणे सुरूच ठेवा!(३)


गिरवावयास काही ती अक्षरे मिळाली,

त्यांच्याच साधनेने,काही ऋते कळाली.


झिजणे जरी चुकेना,तत्वार्थ प्राण ओतू.

वाटा अनंत फिरतो,घरटे उरी परंतु!


मजला उगाळुनी मी मजलाच लेप द्यावा,

आयुष्य चंदनाचे, मरणां सुगंध यावा.


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! (४)


उष्टावले कितीदा,विषयांत नाही गोडी,

चोथाच सर्व उरला,थकली चरुन घोडी.


हलकेच वात वाही,ती दूरची लकेर!

होईल या तमाची जाणा आता अखेर!


काळीज कापराचे वितळुनिया सुगंधी

आर्तातले अभंग भिनतात सर्व रंध्री.


आता पहाटपावा प्राणांतरी घुमावा,

ओला सुवर्णचाफा श्वासात मोहरावा.


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! 

होईल गर्द गहिरा काळोख दाट जेव्हां. (५)


                                  .🍃संतोष

आषाढ अश्रू


आषाढातील अश्रू सखे गं, 

जळांत मिसळून गेले.


कुणा न कळले दुःख अनावर,

क्षणभर तरळून गेले.


नाही फुटला टाहो,

नाही मना वेदना झाल्या,


खोल आतले वर येताना

मधेच अन् घुसमटले.


वरवरच्या ज्या तरंगलहरी,

झुळुक,कोवळी माया,


आत भोंवरे गिरक्या घेती,

टपले सावज खाया.


गेले ते ते गेले,नाही, 

परतून आले कोणी,


इतिहासातील पिवळी पाने!

रद्दी भरल्या गोणी!


खचले,परतून नव्या रुपाने

नटले जरी हे घर,


स्म्रुतीत भिजल्या पूर्व क्षणांचा

जाणवतो वावर!


सुखदुःखाचा लोहताजवा,

परिसाने तोलावा,


असा योग तू दे रे देवा,

सुवर्णक्षण पेलावा!


                                .🍃संतोष

Saturday, May 1, 2021

पावसाची गोष्ट


आई,आजी,ताई म्हणते,

बाहेर नको जाऊस!


मला सांग बाबा,येतो, 

कुठुन बरं पाऊस?


खरंच का रे ढगामधे,

दळत असते म्हातारी?


एवढं पाणी येतं कसं

कोण धरी वरती झारी?


गोष्ट सांगतो ये इकडे,

'पाऊस खाली कसा पडे!'


ऊन लागता वाफ बने,

समुद्रातल्या पाण्याची


उंच ढगांच्या कुशीत तिजला,

जागा मिळते राहाण्याची,


हळूहळू ते ढग पळती

वाऱ्याच्या गाडीवरती,


हिरवी झाडे अन् डोंगर,

पळताना त्यांना धरती.


थंडी लागता उंच तिथे

ढगांतून मग पाणी पडे,


असा येतसे पाऊस हा,

इथे तिथे जिकडे तिकडे,


ढगास आदळून ढग कधी,

चकमक जोराची उडते,


तोच येई,आवाज धुडुम्

वीजबाई ती कडाडते.


गोष्ट अशी ही छोटीशी

ढग,पाऊस,वाऱ्याची!


शोधून बघता सापडती

अशी उत्तरे साऱ्यांची.

   

                                   .🍃संतोष

भोलानाथ

सलील कुलकर्णी यांची एक पोस्ट वाचत होतो तर आठवलं

काल वरद 

भोलानाथ ची कविता 

सांग सांग भोलानाथ, शाळा भरेल काय?

अशी म्हणत होता...☺️

ती त्याची कविता मी खाली पुर्ण केलीय...

म्हणजे पहिले शब्द त्याचेच नंतरची कडवी मी जोडली.


वरदची कविता


सांग सांग भोलानाथ?

शाळा भरेल काय?


शाळेत जाण्यासाठी आई

घाई करेल काय?


पुरे झाले बाबा आता

मोबाईलवरचे लेक्चर,


पुरे झाले कार्टून,गेम,

टिव्ही वरचे पिक्चर..


भोलानाथ...


कित्ती दिवस झाले,

नाही पाहिली माझी शाळा.


बाकावरचे पुस्तक आणि 

भलामोठ्ठा फळा!


भोलानाथ...


भेटलो नाही भांडलो नाही

मित्रांसोबत यंदा.


फोनवरुन हाय हँलो

म्हणू रे कितींदा?


भोलानाथ..


सुट्टी मागितल्याची शिक्षा

देतोय का रे बाप्पा?


तूच त्याला सांग थोडं

मारुन गोड गप्पा,


कोरोना चा राक्षस मारून

शाळा सुरु कर.


आधीसारखं कर देवा

सगळंच लवकर!


भोलानाथ...


                            .🍃वरद/संतोष

आश्वस्त


आश्वस्त इथे मी फिरतो,

नभअश्वत्थाच्या खाली,


ही दिनरजनीची माया,

मजभंवती पिंगा घाली.


ही छाया शितल वाटे,

तरी कसली चिंता दाटे?


इच्छांना फुटतां फाटे,

शतकोटी म्रुगजळसाठे!


अस्तित्व पोळुनि काढी,

तो रवी इथे शिरी धरीला.


परि कधी पहाटे त्याने,

नेत्रांत दीप उजळवला!


नक्षत्रे डुलती कर्णीं,

ती निशानशा अनुभवली,


अन् पिसाट वारा पर्णीं,

अशी रात पिंजुनी गेली.


त्या आकाशाला बंध,

सहजीवन अन् प्रेमाचे.


हळूहळू निळाई चढते

मग श्यामल शामा नाचे.


हे जरी चिरंतन विश्व,

तरी आपणासाठी सीमा!


ती सांजपांखरे वरती,

पुसटशा उमटती प्रतिमा.


ते स्विकारावे सत्य,

ऋत्मंगल संध्याकाळी!


विश्रांत मनाने चित्तां,

द्या क्रुतार्थतेची टाळी.


हे सांगा जाता जाता,

दशदिशास्तंभदंभाला!


जरी क्षुद्र जीव हा माझा,

रसरसता प्राण उशाला.


रवीचंद्रांचे आकाश 

कधीकधी पोरके होते!


आधारवडाला टेकू,

मग पारंबीही देते..


                                .🍃संतोष

Wednesday, April 14, 2021

गुढी


मेघ दाटले,ये काळोखी.

झुकले अंबर उठले काहूर, 

छेदून पटला,उंच धरी शिर,

गुढी उभारा,अशी घरोघर.. 


संशय शंका जळमट सारे

झटकून टाकू पुढील पाऊले

घट्ट पाय हे आता रोवले,

बांधा तोरण,त्वरे शुभंकर...


पाठकण्याच्या मुळात बसली

नागिण वर येण्यास आसुसली,

गुढी सत्य,शिव,मांगल्याची,

तशीच चढूदे,वरती सरसर..


किती संकटे पूर्वी आली,

पूर्वसूरींनी हसत पेलली,

पुन्हा नव्याने गुढी उभवली,

चला गाऊया आश्वासक स्वर...


                                    .🍃संतोष

चाहूल


तो वळीव चाहूल देतो,

सूर्याचे झाकून डोळे,

अन् हुंबदांडगा वारा

गडबडा भुईवर लोळे.


गरगरा,धरुनिया फेर

पानांचे रिंगण नाचे,

वेलींची सुटता वेणी

कर सावरती शाखांचे.


ती डोलडोल करणारी,

जणू माड तान्हुली बाळे,

तो जोजवणारा वारा,

मेघांत स्तन्य हिंदोळे.


नभ गच्च दाटूनि आले,   

अन भरले त्याचे डोळे,

मेघांचे काजळ काळे, 

मग मुखभर माखून गेले.


टपटपती थेंब टपोरे, 

जणू व्रात्य हूडशी पोरे, 

वाऱ्याच्या दोऱ्यांवरचे, 

धरतात धुळींचे भंवरे.


धडधडा धडकती धारा,

तडतडा ताडिती गारा,

सळसळता पर्णपिसारा,

धुळभेट घेतसे वारा.


भय दाखविता ती चपला,

दचकून पाहती सारे.

परि धरा म्हणे धीराने,

हे सरेल नाटक सारे.


हा धुसमुसळा धिंगाणा!

लय माझ्या उदरी आहे,

आवेश,खेळ हा लटका,

घटका दो घटका आहे!


हे शमतील वादळवारे,

अन् उरतील धूळपसारे,

हा वळीव,दूत वर्षेचा,

दे चाहूल,तिज पाचारे.

    

                                .🍃संतोष

Thursday, April 8, 2021

बाळूचा खाऊ

 बाळू:-

भूक लागली आई,

दे ना,खाण्याला तू काही!


आई:-

तुला खायला काय करू?

तोवर पेरु दोन चिरु?


बाळू:-

नको,किती त्या बियाच बाई,

कर ना मॅगी,झाली घाई!


आई:-

तुला देऊ का गुळ फुटाणे?

किंवा मनुका अन् बेदाणे?


बाळू:-

नको,मला तो काढून दे ना,

केक आणला जो मामाने!


आई:-

बरे तरी मग उपमा करते,

सोबत ओला नारळ खंवते,

वरती कोथिंबीर भुरभुरते,

तुला हवी तर शेव पेरते,


बाळू:-

नको मोहरी दाती येते,

मिरची लागून,तोंड पोळते.

आणून दे ना मला समोसा,

सोबत केचप,चटणी मिळते.


आई:-

करु का थोडे,दडपे पोहे,

मस्त फोडणी आणि खोबरे?


बाळू:-

नको मला दे फक्त कुरकुरे,

किंवा वेफर,भरीन तोबरे!


हट्टी मुलाने नाही ऐकले,

हवे हवे ते सगळे खाल्ले,


नंतर पोटच दुखु लागले,

डॉक्टर काकांच्याकडे नेले,


आता बाळू ,खातो गोळ्या,

काळ्या,पिवळ्या,

कडू कडू सगळ्या.


पितोय औषध दाबून नाक,

बसलाय त्याला चांगलाच धाक!


म्हणून सांगतो,ऐकत जावे,

आई देईल ते खुशाल खावे.


                                    .🍃संतोष

Sunday, April 4, 2021

मुग़लीयात

कुछ तो पैदा हुएँ,

मीर,गालि़ब वरना,

ए मुग़लीयात!तुमने हमे,दिया क्या है?


हुआं औरंग़,बदौलत,

माना शिवराज आये,

वरना ऐयाश-तबस्सुम-ब-कत्ले-आम पाये।


हुएँ कुछ तानसेन,

पर थे हूएँ,जब वो मियाँ,

हूएँ बीरबलभी जिन्हे,

अंत मे फरेब़ दिया।


व़ह जो है ताज मो-हसी़न

उसके तह़खाने,

सुना है ख़ून पसीने से तुले पैमाने!


गुरु़र करना है तो करो!

फिर काफी़र आये!

फिर आये बुतशि़कन् तो,

कुछ तो हिंदपरस्त़ आये!


बीर बंदा,गुरुगोविंद के कुछ जट्ट आये!

शिवभूप के कुछ तेज तेग मरहट्ठ आये!


                                   .🍃संतोष

चांदणे

पोळते का कोवळे हे

उगवणारे चांदणे?

आसवांना पापण्यांची

आज का आमंत्रणे?


काजळाच्या शाईची जी

ये लिखावट खालती,

मुक्तछंदे वाहती,त्यां

घाल काही बंधने.


चंद्र धवळा उग्र वाटे

किरण त्याचे,होती काटे,

काय ऐसे शल्य की,

ही फिकटली तारांगणे?


विरह म्हणू तर मी समोरी!

नजर काही दुःख चोरी,

'काही नाही'चीच कितीदा

चालली आवर्तने!


हस्तस्पर्शी भाव नाही,

मज कळाया वाव नाही,

गाढ झोपी गाव गेला,

विझून जाई चांंदणे!


मूक चिन्हे उष्ण काही,

मग पहाटे स्कंध वाही,

अन् स्म्रुतींच्या घट्ट कोषी,

फक्त काही स्पंदने!!


                                   .🍃संतोष

Friday, April 2, 2021

स्फुट स्तुतीकणिका


श्री गणेश स्तुती 


गणु कोणत्या जातीचा?

फक्त पुतळा मातीचा?


गणु पोरगेला पोर?

धीर गंभीर नी थोर?


गणु फक्त रम्य कथा?

परंपरा रुढी प्रथा?


गणु मिष्टार्थी तुंदील?

कलामर्मज्ञ चपल?


गणु पार्वतीचा बाळ?

महाकाळाचाही काळ? 


गणु सोवळा ओवळा?

संगे कोणता बा मेळा?


गणु सगुण निर्गुण?

त्याची कैसी बाबा खूण?


साधे सोपे आहे मर्म

तोच गणुचा हा धर्म.


गणु अंतरीचा ठसा

भावभक्तीचा आरसा.


ऐशा गणोबाचे गाणे

शुद्ध धुनांचे तराणे.


मला एवढेच कळे

सुटो तर्कांचे वेटोळे


कशा आव पांडित्याचा

आणि माज चिकित्सेचा?


शुद्ध भाव गणु *साचा*

घोष चिन्मय नामाचा.


धर्म पंथ मते नाना

वाद संपता संपेना.


गणु सापडला ज्यांना

जावे शरण तयांना!


                . 🍃 संतोष


हे कालमूषकवाहना!

                       गजानना गजानना! 


कुटीलबुद्धी सर्प पिळुनि

कमरबंद बांधला.

भक्तीमोदक तर्कपरशु

भिन्न जोड सांंधला.


महाकारणदेहधारण    दिव्यसुक्ष्मसुलोचना!

                        गजानना गजानना!


भग्न द्वैत एकदंत

अधममर्दना क्रुतांत

आश्रयास श्रांत क्लांत

अभयदान हरत भ्रांत


रिद्धी सिद्धि चरण चुरत

गण नर्तक न्रुत्य करत

गं गणपती ध्यान धरत

नादब्रह्म प्रणव झरत


जगड्व्याळ जगत जनक जगतजीवजीवना, 

                     गजानना गजानना!


नाममदे मत्त गंड

डुलत, झुलत सरळशुंड. 

चित्लक्षी आत्मपिंड

बाह्यात्कारी प्रचंड!


अहंगंड, न्यूनगंड, 

क्षरत, करत खंड खंड


रक्तगंधलिप्त अंग रक्तपुष्प पूजना.

                    गजानना गजानना!


कुंडलिनी जगदंबा

मूलाधार हेरंबा

जाग्रुतदर्शनशोभा

सहस्त्रार रविबिंबा


इडापिंगलेस गांठ

सुषुम्नेस करत वाट

चिदानंद उठत लाट

फुटत ब्रह्म निजपहाट.


राजयोगी योगीराज दुरितकष्टहारणा.

                       गजानना गजानना!


कली माजे शास्त करी

कलकलाट क्लिष्ट हरी.

सुगमसुखदनाम सरी

वर्षुदेत सकल शिरी.


पुरवीशुद्धबुद्धप्रेम, नुरवीक्षुद्रवासना


                    गजानना गजानना!


              🙏🌺🌸🌺🙏

🕉️

अं *गं* रक्तसुरं *गं*

ज *ग* तापहरण,क्रुतचूर्णविघ्नन *ग*

चर *ण* सुकोमल,अष्टादशदल,परिवेष्टित ग *ण*

अनुता *प* दग्ध मन!स्मरत मंत्रज *प*

अंब *त* नय,करपरशुपाशध्रु *त* 

ध्या *ये* त्चित्संतोषे गुणपत *ये*

घ *न* कलौ त्वत्पदे गजान *न*

न *मः* स्खलनं क्ष *मः*                                                         

शेवटच्या अक्षरांनी, 

आणि सुरुवात करताना, चढत्या व उतरत्या क्रमानी 

*ओम गं गणपतये नमः* हा मंत्र गुंफला आहे.

-----------==--------==---------------==------


शिवस्तुती -

शं करोति शंकरः जटाधरः उमावरः

महेंद्र मोक्षकारणं मनोहरः महेश्वरः


अनादिमूलकारणं दिगंबरः दयाकर:

त्रिभंगशूलधारणं विशुद्धचंद्रशेखरः


शंकरः शुभंकरः शिरं शशांशशोभनं

गिरीसुतावरं प्रपंचपातकप्रभंजनं


भं ध्वनी भयंकर: अनंगअंग भर्जनं

डं निनाद नादने अनाहतस्य गर्जनं


कंठनाल नील, धीर, कालकूटप्राशनं

सुषुप्तीलीनलोचनं हिमाद्रितुंगवासिनं


स्फुरत्भुजांगभीषणंभुजंगमालभूषणं

प्रसन्नचित्तचंदनं, प्रमादभस्म, लेपनं


षडाक्षरीत्वदीयनाममंत्रघोषघोषणं

षडारिषण्मुखप्रियःत्वमेवचित्तपोषणं


आमोदबोधबोधनं समाधीसौख्यसेवनं

प्रमोददायकं प्रचंडविश्वनाट्यखेलनं


आत्मलिंगरूपशुद्धवेदसारमंथितं

अनात्मभेदलोपकं,सदार्यकार्यसंस्थितं


कलीमलविमोचनात्त्वमाश्रये पिपासितः

दयाब्धिदीनबांधवः पदौविलीनईप्सित:


अहं न पंडितं कवी,त्वदियदीनबालकं

क्रुपादयानिधिश्वरः त्वमेवशब्दचालकं


      .  🙏 🌼🌼🌼🙏.       

 

*गुरुकरुणाष्टक*


व्रुत्त:-शिखरिणी.


गुरूमाऊलीये,झडकरि अतां मार्ग सुचवी.

धरीला तो ग्राहे, गजपद तसे मानस भवी.।।धृ।।


सुखाच्या आभासे विषय विष या पंचविवरी,

त्यजाया ना शक्ती भुरळ पडता सेवन करी।

सुमार्गामाजी या षडरि बनती त्रासद किती,

सुमामाजी जैसे अलिदल बळे आंत रिघती.।१।


धरी मालाहाती सरकत पुढे फक्त मणी हे,

मनी नाही मूर्ती अधिर स्मरते मेरुमणी हे।

न्रुपाच्या धाकाने उगिच पुढती भाट फिरती,

जपाच्या सोंगाने पुटपुट तसे ओठ करती।२।


श्रमाया ना लाजे खडतर जरी भोग पूर्ती,

रमावेसे वाटे बहुविध खुळे खेळ भवती।

कधी काही बोधे उपरतिमनी होऊ पाहे,

पुन्हां जाते मागे घसरुनपडे,त्रासताहे।३।


नदीच्या काठाने अलगदपणे जात असता,

रूते कोणी तेथे दलदल जिथे पाय फसता।

तया ना सामर्थ्ये निजबळबळे होत तरणे,

त्रयस्थाच्यासाठी हतबलपणे वाट बघणे।४।


तसे या संसारी तुजविण कुणा हाल दिसती?

उगा कोणी काही दुरुन भलते प्रश्न पुसती।

त्वरे हाता द्यावे उचलुनि वरी घेई मजला,

अहंता मारावी तवशुभपदी जीव निजला।५।


सुखाने भोगांना कवळुन कसा पूर्वी बसलो,

पुन्हा येणे जाणे,जननमरणी पूर्ण फसलो।

कुणासाठी गाठी,वहन करु मी पूर्ण थकलो,

तुझी सेवा गांठी,भवजल,तरी पूर्ण सुकलो।६।


क्रुतक्-कोपे माता नयनफुलवी रागीट पणे,

परी हे तो प्रेमे!सुलभ पुढती मार्ग दिसणे।

तशी येती विघ्ने अवचित इथे,भ्रांत नसतो,

तुझ्यापायीसारे!अडचण जरी शांत असतो।७।


पुरे आता झोका सदयबनुनी स्थीर करवी,

सुखा,दुःखा पाठी ढकलत पुढे श्रेय नुरवी।

असो दे ही वाचा,सतततुझिया गुंग स्मरणी,

झिजो दे ही काया,कलिमलहरी,लीन चरणी।८।


     🌼🌸🌺🙏🌺🌸🌼


                                   .🍃संतोष

          

                           

श्री ज्ञानदेव

नूर भी शर्म से, 

कुछ फिका सा 

इनके आगे,


ये है श्री ज्ञानदेव,

रुख़ करे, 

मुक्ती आगे।                           


विठ्ठल 

इश्क-ए-हकी़की़ मे, 

हर इक सूबा जहां 

डूबा रहा!


ये है विठ्ठल,

उसीके नाम मे,

ये अजूबा रहा।


                                   .🍃संतोष

खंड-अखंड

 

खंड खंडसे जुडते जुडते

रुप ये हमने पाया,


खंड अखंडसे जुड नही पाया

फिर क्या हमने पाया?


जो हमसाया, उसीसे माया,

वो उसकी है छाया,

छाँव भी देती,और सुलाती,

ऐसें काल गंवाया।


कालपरिक्षा बहुत कठीन है,

सभी है खाते धोखा,

वो कहता है हाथ थाम ले,

तुझको किसने रोका?


अंधा बेहेरा लूला लंगडा, मै 

तू भी निर्गुण है....

खुद आकर तुम थामो,

तेरे सगुणरुप मे मन है।

                                    .🍃संतोष

पक्ष्यांचा अभ्यास (शिशु कविता )

 

कावळे दादा,काव काव 

किती करता?

इकडून तिकडे,तिकडून इकडे! 

काय फिरता?


चिऊताई चिव चिव,

किती बोलता?

पानांमध्ये लपाछपी 

किती खेळता?


बुलबुल भाऊ,खाता खाऊ,

छान दिसता,

केव्हा इथे,केव्हा तिथे !

किती लाजता?


कबूतर काका,

किती बरं दाणे टिपता?

खाऊन खाऊन

बसतो घसा,घुमत बसता!


पोपटराव तिखट तिखट 

मिरची चाखता!

तरीसुद्धा सांगा कशी 

तब्येत राखता?


सारखे तर, तुम्ही सगळे, 

खेळत असता!

खरं सांगा,अभ्यासाला 

केव्हा बसता?


                                   .🍃संतोष

उन्हाची कहाणी


आटपाट काळपुरी!

रहिवासी क्लिष्ट!

त्यातलाच एक,त्याची, 

उन्हाची ही गोष्ट !  


पहाटेच्या वाटांवर,

क्षितीजाच्या काठावर,

मंद वायूलाटांवर

रांगणारे मूल!


कोवळ्याशा उन्हाची ही

ललित चाहूल!


खेळे अंगाखांद्यांवर, 

पाने फुले फांद्यांवर, 

रेशीम वा चिंध्यांवर,

खुदुखुदू हासे!


विभास हा स्वरभास!

 चहूकडे ठसे!


एकरूप होई पुढे

माध्यान्हसूर्याशी,

दाहकसा अंगसंग

दहाही दिशांशी!


 कुणासाठी तप्त-

मधसूरजा चे घोट?

भीमपलासा ची छाया, 

सारंगां चे बोट? 


पुर्वीकडे, हळूहळू  

लांबल्या सावल्या!

पुन्हा वनश्रीच्या 

खाली खेळाया धावल्या. 


आणि दूर जीवघेणा 

काकली निषाद!

निनादला हंसध्वनी,   

विरला विषाद!


हळूहळू दिसेनासे 

मावळते उन!

सायंकाला हाती गेले 

विरह ठेवून.


कोंदटला विरहार्त,

गहिरा धैवत, 

मारव्याचा सूर गेला 

काळीज कोरत!


सफळ सुफळ तरी  

अपूर्ण ही कथा!

व्यथा नव्हे,प्रथा नव्हे,

अनुभवा स्वतः!


                                    .🍃संतोष

Emily 2

 Original poem..


Look back on time, with kindly eyes-

He doubtless did his best.


How softly sinks that trembling Sun In Human Nature's West.


                  .. Emily Dickinson


भावानुवाद.


स्निग्ध द्रुष्टीने न्याहाळी भूतकाळ,

त्याने जीवेभावे भरली ओंजळ.


हळू थरथरे मावळता रवी,

आणि पश्चिम-ही! स्वभाव मानवी!


                                  .🍃संतोष

Emily 1

 Original poem:-


I'm Nobody! Who are you?

Are you - Nobody - too?

Then there's a pair of us!

Don't tell! they'd advertise - you know!


How dreary - to be - somebody!

How public - like a frog -

To tell one's name - the livelong june -

To an admiring Bog!


                     Emily Dickinson.


भावानुवाद:-


अनोळखी मी- तू कोण?

अनोळखी का,तू पण?

जमली जोडी मग आपली

फुटेल वार्ता - अळिमिळी!


ओळख आपुली नीरस कीती

बोभाटा - दर्दुरस्तुती!

आषाढी परिचय देती,

अन् दलदल ही - त्यां स्फूर्ती!


                                .🍃संतोष

Wednesday, March 31, 2021

दाखला

 

मिचमिच डोळे,पाठ कमान

लटलट थोडी हलते मान,


हाती काठी तिसरा पाय,

हळूहळू ती टेकत जाय.


चेहऱ्यावरती ग्रीष्म किती!

नजर करारी, नसे भिती.


कुठे जातसे,कुतूहल दाटे 

अंदाजांना अनंत फाटे. 


हाती पुस्तक कागद काही,

चाचपुनी वरचेवर पाही.


आजी काही मदत हवी का?..

...लुकलुकल्या डोळ्यात तारका


म्हणे मुला मज उमजत नाही

पहा तुला का कळते काही?


पाहुनी कागद ओशाळे मन,

अगतिकसे ये अवघडलेपण!


नव्हता विठ्ठल!....पुढची वारी?..

बोळक्यातले हसू विचारी!


व्रुद्ध जिद्दीचा बुरुज झुंजत

मरणापुढती उभा ठाकला!


अन् कागद हे तिला सांगती,

जिवंततेचा हवा दाखला!


                                    .🍃संतोष

Monday, March 29, 2021

प्रश्न (बालकविता )

कधी कधी मला काही 

कळतच नाईं!


असं का गं मोठी माणसं

वागतात,सांग आई?


नेहमी खरं बोलावं हं!

बाबा सांगत असतात.

घरात नाही,निरोप ठेवून

खोलीत जाऊन बसतात.


साधी रहाणी उच्च विचार!

सांगत असते ताई,

आरशासमोर नट्टापट्टा

कित्ती करते बाई !


कम्प्युटरवर बघत दादा

बडवत बसतो बोटे,

देत नाही मला,

दमते,खेळून सागरगोटे!


लहान आहेस अजून!

असं आजोबा म्हणत असतात,


मोठी झालीस! म्हणते आजी,

तेव्हा फक्त हसतात!


आता ठरलयं माझं गुपचूप

देवबाप्पा पुढे,


भरभर होईन मोठी!

कुण्णाला सांगू नको हे गडे!


                                    .🍃संतोष

भाजी ( बालकविता )


भाजीवाल्या मावशींच्या

डोक्यावर पाटी!


काय काय भाजीपाला

कुणा कुणासाठी?


आजीसाठी लाल माठ 

आणि पालक,अळू,


पालेभाजी हवीच,म्हणते

अळूवड्याही तळू.

 

तिखट तिखट 

मिरच्या हिरव्या,

आजोबांना हव्या,


लोणच्यासाठी आणून देतो

म्हणती बरण्या नव्या.


बाबा घेतात कोबी फ्लॉवर

डब्यात भाजीसाठी,


ताई घेई छोटी वांगी

भरून करण्यासाठी.


भेंडी पडवळ,कडू कारली

आई सगळं घेते,


कोथिंबीर कडीपत्ता लिंबू

आले जरासे नेते.


मला आवडे लाल टमाटा, 

आणि गाजर गोड,


देते आई चिरता चिरता

हळूच खाया फोड.


                                    .🍃संतोष

Sunday, March 28, 2021

सिकंदर आणि सिंधू


मत्त हत्तीच्या मदात भिजला अश्व यशाचा माझा,

मी प्रुथ्वीपती, मीच सिकंदर ,मीच येथला राजा!


पायी पर्शिया,अर्धा आशिया, सिंध बलोच ही आहे.

जगती जिंकून घेईल मजला कोण असा तो आहे?


न्रुप थोर अन् महावीर मी भूमीवर लोळवले,

पराक्रमाची शर्थ करोनी राज्य असे मेळविले.

तारांगण ही कवेत घेईन,चुरगाळीन नक्षत्रे,

पौरस,दारस क्षुल्लक राजे,हलवीन मी न्रुपछत्रे.


ओलांडीन मी समुद्र साती,पोलादी ही छाती,

आहे वांच्छा,सूर्य गिळावा,चंद्र पिळावा हाती.

ज्वालामुखी चा लाव्हा बनुनी,पोळावे दिनरात,

वन्ही होऊन वन जाळावे तसे रिपु समरात.


खडकावरती घेई धडका जसा जलधि फेनिल,

अथवा दाटे,घेरुन टाके,क्रुष्णमेघ नभ नील.


कराल दाढांतुनी कालीची,जिव्हा,वीजेचा लोळ,

कुरूक्षेत्रीच्या शंखध्वनीपरि,अवचितघनकल्लोळ.


तसा दरारा माझा,देतो दहा दिशांना आज्ञा,

झुकवुन माना,गजपती,हयपती,नडे,कुणाची प्राज्ञा?


दिसे पुढे ती खळखळ वाहे विशाल पात्री, सिंधू.

नदी नव्हे ही महानदचि जणू नावासम वा सिंधू!


सिंधू जर का ओलांडीन मी,भारतभू घेईन,

आणि खरोखर त्रिखंड जिंकून जगजेता होईन.

परि जिद्द ही पटे न सर्वां सैन्य अतां चुळबुळते,

पुढे जावया पद रेटेना,निष्ठाही डळमळते।


भुकेजलेले कोणी,कोणी धीर खचोनि पडे, 

कुणी जाहले उतावीळ ते नेत्र पश्चिमेकडे.

वाट अडवुनी नागिण पडली तशीच सिंधू पुढे,

आणि सिकंदर प्रिय सैनिकांमाजी एकटा पडे!


कधी न अडला घोडा आता परत फिराया वळे,

अंतरातला विश्वविजेता मूकपणाने जळे!



उपसंहार:-


हिच सिंधू जी हिंदरक्षिता,ग्रीकभक्षिणी झाली,

पुढे मौर्य अन् चाणक्याला सूचित करूनी धाली.

जनगणमन म्हणताना का ही जिव्हा अडे तिजपायी?

सिंध,सिंधु ही खंडीत धुंडीत विभागलेल्या देहीं.

मला वाटते प्रश्न विचारी,सिंधु भारतीयां ही! 

मम पात्री ह्या रवीबिंबाला अर्घ्य कोण ते देई?

Thursday, March 25, 2021

संवाद


तो -

दाट अंधाराची साय, 

त्यात भिजती चांदण्या.

तुझ्या डोळ्यातले उन

तरी का गं मावळेना?


उष्ण उसासेही गेले

गेले गर्द गहिंवर.

परि नजरेच्या काठी

दिसे अनोळखी पूर.


मुके ओठांचे टपाल,

नाही पत्र चिठ्ठी तार,

फक्त ऐकू येते तुझी

मध्यरात्रीची सतार.


ती -


नको छेडछाड करु

माझ्या आतल्या तारांशी

किती सायास करुन

षड्ज जुळला स्वतःशी.


माझे उन माझ्यापाशी

आहे जुने अविनाशी.

जेव्हा भिजते हे मन

तेव्हा धावे त्याच्यापाशी.


तुझा हात हवा हाती

नको मला तुझा खांदा.

तुझ्यासवे मनोभावे!

आत मनाचा पोशिंदा.


                                   .🍃संतोष

Wednesday, March 24, 2021

वसंत


वृत्त - वसंततिलका.


आला वसंत हलके,म्रुदु पाउलांनी, 

येताच व्रुक्ष लतिका,भरती फुलांनी.

गंधांत गंध मिसळे,उसळे सुगंध,

शाखांस पुष्प झुलती,जणु बाजुबंद.


तेथे पलाश इकडे फुलला बहावा 

नाजूक कोंब,फुटवा,नयने पहावा.

येती तयास पुढती मग स्वर्ण घोस 

जाते सुदूर कीर्ती कित्येक कोस.


तैशी पलाश तनूही मग रक्तवर्णी   

माखून लाल उटणे जणू पुष्प पर्णी.

येतो बहार दारी गुलमोहराला,  

शोभे छटा सुरेख नीलमोहराला.


काटेच अंगभरुनी जरी शाल्मलीला.

ल्याली सहस्त्रपंखी पुष्पे दुशाला.

ऐसेच कांचन,कुडा अन् पांगिरा हा

गेळा,अशोक,करमळ सुमलाजरा हा.


स्वांगे धरी वसंत जणू देवचाफा

श्वेतांबरात किंवा करी भस्मलेपा.

ऐसा वसंत फुलता,कवी ये भरासी

गाते वसंततिलका,कुसुमाकरासी.


    

                                  .🍃संतोष

Monday, March 22, 2021

सांज


सांजभूल,दिवेलागणीच्या वेळी, 

गेली,निसटली,मानस मासोळी.


जशी रात्र लख्ख चांदण्याची भाषा,

किंवा दिस दावी ठळकशा रेषा,


तसे हिचे काही सांगता ना येई,

वाही पालखीत नहुषाचे भोई.


म्हणे आता शोधा उत्तरेला तारा

आणि तिथे द्रुष्या अद्रुष्य किनारा!


दिन क्षितिजा पल्याड दूर जाई,

रात्र विंगेत नटून वाट पाही.


हिचे औट घटकाच राज्य जरी,

आणि अंधुक दिशांचे मानकरी, 


खोल काळजात आत उठे ठसा

वरपांगी करु काही मिटे कसा?


झुंजूमुंजू होई त्याचे प्रतिरूप,

तरी वेगळेच संध्येचे स्वरुप.


कोरी चंद्रकोर तिची पडछाया,

किंवा फिकटला अत्तराचा फाया.


दूर पाण्यावर हलणारी होडी

किंवा धुक्यामधे दऱ्यांतील खेडी.


शांत डोही,पडे खडा,डहुळते 

आणि उठती तरंग हळू तेथे.


तैशा तरंगांची भाषा तिला येते, 

कसे करू त्याचे भाषांतर येथे? 


कसे चीक पडद्यांचे तिचे घर!

दिसे,तरीही न दिसे खरोखर.


तिचे आर्त तिच्या हृदयात झरे 

आणि तीची मिठी सृष्टीभर उरे.


ओली वाळू पायी,लाट फिरे मागे

किंवा पीळ हाती, सुटतात धागे, 


तसे तिचे वाजे कानी अलगुज,

कळे काही,राही काही,गुढ गुज.


घरी फिरे जेव्हा पाखरांची भिरी 

चुके चुकार पाखरू कोठेतरी,


त्याच्या मनी तेव्हा जे जे काही होते

ते ते सारे तिच्या रुपे प्रसवते.


नव्हे सांज धुंद प्रमदा पदर,

नव्हे षोडशी बालिका मनोहर,


हिने खेळविली किती युगबाळे?

हिचे स्तन्य किती अंगांतून खेळे!


तिचे नेत्र तृप्त, तरीही विरक्त,

स्निग्ध द्रुष्टी केश मोकळे विमुक्त,


जैशी योगिनी तापसी एकभुक्त

बसे ध्यानमग्न ध्यात गात सूक्त!


जप गायत्री,सामगे,दशपथे,

पुढे यज्ञहीन यज्ञ-उपवीते!


सारे तिच्या पोटी,तिच्याच साक्षीत्वे, 

सारे पाप पुण्य,सारी ही कवित्वे.


अशी सांज तिची गूढरम्य कथा, 

फक्त अनुभव!कळण्यास स्वतः!


तिनी सांजा जरी,तिन्हीसांजमाता

लागे निरांजन आत,गाता गाता.


                                   .🍃संतोष

पावनखिंड


ते फक्त तीनशे होते

परि भीष्म द्रोणसे होते!

हातांत खुल्या तलवारी,

अन् पाय अचलसे होते!


ती झुंड मुसंडी मारे

म्लेंच्छांचे आले भारे

मारा मारा कापा रे!

दुमदुमले ते हाकारे.


दमदार बाहू फुरफुरले

उरी तेज चंडीचे भरले

अंगात रुद्र संचरले,

शत अभिमन्यू रणी शिरले.


गरगरा फिरे तो बाजी

जंव सूर्य ग्रहांच्या माजी

घेऊनीया बंधू फुलाजी

प्राणांची लावीत बाजी.


ती फिरते नच समशेर,

जणू चक्र सुदर्शन फिरते.

शिशुपाल शेकडो कंस

हतवीर्य करोनी चिरते.


जणू अग्नीकुंड धगधगते

समिधांसम रिपुंना गिळते

किती यत्न लाविले बळ तें,

परि वाट पुढे ना मिळते!


तनु लालतांबडी झाली

रक्ताने भूमी न्हाली.

वस्त्रांची झालर झाली,

परि शस्त्र न येई खाली.


तो थकला जिद्दी सिद्दी,

कोठून ही झाली बुद्धी!

हा सैतान की ह्या सिद्धी?

खिंडीत सैन्यअवरूद्धी!


मग मागविली बंदुक, 

बाजींवर धरिला रोख

ती गोळी सुटे निर्धोक,

बाजींचा जाई झोक..


तरीही धडपडती,उठती,

नच नेत्र आपुले मिटती.

कर शस्त्र धराया झटती,

शिवराय..तोफ..पुटपुटती.


व्याकुळ प्राण कानांशी,

'मी शब्द दिला शिवबांसी'

रोखीन घोडखिंडीशी,

जाऊ न देई मसूदाशी.


अन् तोफ खुणेची झाली,

स्मितरेषा वदनी आली.

क्रुतक्रुत्य जीवने झाली

त्या पावन खिंडी खाली.


                                       


                                  .🍃संतोष

पक्ष्यांचे गाणे(बालकविता)



चिमणीच्या चोचीमध्ये, 

तीन चार दाणे,


कबूतर गोरे गोरे

भरते बकाणे,


कावळ्याचे गाणे 

कसे भसाडे बेसूर.


कोकीळ लपून

त्याला शिकवतो सूर.


लाल लाल चोचीमध्ये

गोड गोड पेरू,


पोपटाचे पिल्लू कसे

बोले चुरूचुरू.


फदक,फदक,बदक आले,

चपटी चोचवाले,


पाण्यामध्ये पोहताना

पाय कुठे गेले?


मोर आला लांब लांब

ओढत पिसारा,


फुलवताना निळाभोर!

राजावाणी तोरा.


गुलगुल बोलत बुलबुल आले

भिरभिर शिंजीर करी.


चोचीवरती चोच चढवून

धनेश फांदीवरी.


वटवट्याची अखंड वटवट,

सुतार ठकठक करी,


कोतवाल हा फेरी मारे

गगनी वरचेवरी.


सगळे पक्षी आले आणि,

नाचून नाचून गेले.


मुलांसाठी एक एक पीस

बक्षीस ठेवून गेले..


                                    .🍃संतोष

Tuesday, March 16, 2021

डोळस आंधळा

 

एक आंधळा पुसे दुज्याला 

असेल कैसी दुनिया न्यारी 


रंगबिरंगी नाट्य मनोहर, 

असेल गंमतजंमत भारी 


म्हणे दुजा,मज वाटत नाही 

असेल काही येथ रम्य ते 


रोज ऐकतो मी कोलाहल  

चित्र खरे नच फक्त भास ते. 


जाई तेथून डोळस कोणी 

म्हणे बोलसी सत्य परंतु 


भास भोगल्यावाचून उत्कट 

कळेल कैसे सत्य परंतु?


म्हणे आंधळा पहिला तेव्हा 

मजपुरते मज कळले उत्तर 


भास जगावे डोळस होऊन 

मनगटास या लावून अत्तर. 


हसे दुजा मग उदासवाणे

म्हणे पुरे हे व्यर्थ तराणे. 


शुन्य प्रसवते केवळ शून्ये.

कसली दृश्ये कसले दिसणे? 


डोळस तेव्हा बोले अंती 

मिटुनी डोळे मग एकांती 


कळले जे मज वळले नाही! 

पहिला मिळविल अंती शांती!


                               .🍃संतोष

परी



हिरमुसलेली परी पंखहीन 

पाय चालली ओढत ओढत.


दुःख अनामिक घेउन पदरीं

पिसे खुणांस्तव सोडत सोडत.


पवना जा रे हळुच अलगद

मौनकळी फुलते का बघ ना!


जा पक्ष्यांनो शीळ ऐकवा 

अळिमिळी सुटते का बघू ना!


काय करावे उमगेना त्या 

खारुताईला पडले कोडे!


उगाच बुलबुल घिरट्या घाली

बोलून पाही वाडेकोडे!


पारंब्या पसरून पाहतो 

वड म्हातारा मिश्कील हासे.


ठावे सारे काही त्याला,

परि वागणे तटस्थ भासे.


कलला दिनकर पश्चिमेकडे 

अंधुक झाली द्रुष्ये भवती.


निशा नाचवी नवीन पात्रे

रातकिडे ते किरकिर करती.


कसे कळावे मनातले अन 

कसे खुलावे हसू लाघवी.


नभी चांदण्या चिंतीत वरती

आणि चंद्रमा रात्र जागवी.


मिटले डोळे तिचे परी नच

निद्रा घाली तिजवर पाखर,


अंधुकश्या मनीच्या स्वप्नांची 

अश्रूंतच विरघळली साखर!


कोण परी ही?नव्हे कल्पना!


नव्हेच आशा, नव्हे निराशा 

नव्हे घडीव सोनेरी भाषा.


अनुकंपा नच ,नव्हेच समता. 

ही आपुली संवेदनक्षमता!

 

संवेदनक्षमता ही आपुली

पहा कशी ती मलूल झाली!


कसे जपावे तिला,मलाही ठाऊक नाही!

कसे रुचावे तिला जगातील घाऊक काही? 

 

ती यावी परतून म्हणून करा काहीही,

द्या बुडी खोल वा पहा दिशा दाहीही.


असले काही उत्तर तर 

द्या धाडुनी मजला. 


हा विशाल वाडा तिच्याविना 

शब्दांचा सजला!

      

                                    .🍃संतोष

Monday, March 15, 2021

तहरीऱ

तहरीऱ


अब ये दिदार भी ,

तहरीऱ का, ना भाएँ मुझे!


अब क्यूँ है, गैर से

यूँ, लफ़्ज़ भी, ना चाहे मुझे?


अश्क भी सूख गये,

जिनसे मिले ,कुछ तारिक़!


अब तो बेखौफ़ है ,

ये राहें जो, ले जाये मुझे!


बात ईतनी न थी,

संगीन की तुम इतराओ!


मान भी जाओ,

की अब,तल्खीयाँ सतायें मुझे!


हुए गमगीन भी,

साये हमारे,तब थे हमराही!

 

आज तो,आब-ओ-हवा,

खुशनुमा! दो साथ मुझे!


वादा ये कर न सकू,

साथ जियूँ, मै हर पल!


पर कुबुल़,तुझसे मिली,

खुदकी यूँ,पहचान मुझे!


                                   .🍃संतोष

मेरा मन


यूं बादल की गोदमे, 

छिप रहा चाँद हैं, 

या मेरा मन!


खयालोंके दिये हैं 

बुझ रहे,हैं शाम,

या हैं, मेरा मन? 


रात के बाल बिखरें,  

चांदनी हैं फुल सीं 

फिर क्यूँ शिकन? 


होंठ क्यूँ सिल गये,  

खामोश चिलमन के, 

ये हैं फिर, मेरा मन?


तप रही धूप से, 

ना हैं गिला,  

ना ये चुभन!


हैं याद, झुलसीं ख्वाहिशें!

उसमे थी, क्या वो 

मेरा मन?


उम्रकैदी को,

झरोखा दिखायें

साज़़-ए-चमन, 

उस नजारो,को ही 

सच,मान चला 

भोला ये मन!


रुबरु दर्द से यूं, 

आबरु बेपर्दा हो जाये, 

तो भी मंजूर हमे!

मय के प्याले ,पडे खाली, 

या हैं फिर, मेरा मन!


नन्हीं चिडियाँ या

भरी चुडीयाँ, ढुंडे घर ही!

उम्र की चांदनी हो,

सिरपे उन्हे, ना हो घुटन!


सादगी साफ दिखे,

और जुबां, हो ये नयन! 

ह़़या उनकी हैं या अब, 

आ़ईने-रब,मै मेरा मन!


                                  .🍃संतोष

शब्दोच्छ्वास

 *शब्दोच्छ्वास!*


चालत्या गाडीत मस्तकी ओझे 

तसे माझ्या शिरी मीपण माझे. 

खाली ठेववेना,फजिती टळेना 

कच्चे हे मडके कोण गा भाजे?


ओझे ही संपत्ती?अथवा भ्रम? 

पुष्कळ केले की त्यासाठी श्रम !

वाटोळा वेदांत कर्म व्युत्क्रम,

जन्म जरा यम, चालला क्रम.


लाचारी चे पुच्छ हालते मागे 

भरजरी दिमाख आणखी मागे. 

सदिच्छा,सदाशा सारून मागे 

वासना इच्छांचे वेताळ जागे.


नेमस्त नाटक चांगुलपणा 

अंतरी मत्सर काढतो फणा 

सात्विक संताप,त्याला पश्चाताप!

कोडगा सुखात मिरवी गुन्हा.


मधाच्या बोटाला शेकडो मुंग्या 

साधूच्या बोटाला डसती नांग्या 

गंजल्या तलवारी मनात नंग्या.

कानाशी वाजती गाजरपुंग्या!


सोवळे सोज्वळ सुकून गेले 

बेरकी मनात घुम्मे हे चेले. 

सहज सरळ सांडून गेले.

शांतीसाठी आता सुगंधी तेले.


असा हा प्रवास रात्रंदिवस 

पेंगत्या स्वप्नांचा खुळा उरूस. 

कसले प्रयोग सत्याचे भास 

अहिंसेचा खाटीका घरी वास.


क्षितिज कोरीत उगवो उषा, 

भिन्न काली भिन्न क्रांतीची भाषा. 

समभाव भोंगळ भाबडी आशा 

स्वतःची ओळख,स्वतःच्या देशा!


                                   .🍃संतोष

Friday, March 12, 2021

उष्म्याचे दिवस

दिन हे दाहक उष्म्याचे,🔥

टोपी, काळ्या चष्म्याचे.🧢😎


सूर्याचा का चढला पारा 🌞

म्हणे त्रासुनी कुणी बिचारा.


धगधगतो परिसर जरी सारा

मिळे शोधता काही उतारा.


कुणी घेतसे ऊस पिळोंनि,🎋

ताक कुठे सैधवे घोळूनि.


लिंबू सरबत,कुठे शहाळे,🍋🌴 

कुठे कलिंगड रसाळ काळे.🍉


थंडगार वाळ्याचे पाणी 

फुले मोगरा,मनी,अंगणी. 


मधुर अंजिरे टरबूज खरबूज.🍈

संत्री, द्राक्षे करिती हितगुज.🍊🍇


कोकम,जांभूळ अन करवंदे 

अगडबंब फणसांची दोंदे.🥔


येतो मागून टाकीत पाऊल 

भूपापरी दे आधी चाहूल.

 

कोकीळ सांगे,ऋतू हा धाला 

बहराला आंबा हा आला.🥭


पन्हे गारसें पहिल्या बहरी, 

मंद उष्ण चैत्राच्या लहरीं. 


राजा हापूस,प्रधान केसर 

सचिव पायरी,रस अग्रेसर. 


आंबरसास्तव पिळले कोणी 

अधीर कोणी चोखे धरुनि.


कुणी नेमस्ते,चिरल्या फोडी

कुणी चाखे कोयींची गोडी. 


सुहृद खरे हे गोड सोबती, 

सह्य उन्हाळा आपुला करिती.


असा ग्रीष्म येतो दर वर्षी, 

शोषदायी परी रसपरिपोषि!


                                    .🍃संतोष

दिनचक्र


लाल केशरी अन सोनेरी

छटा दाखवीत अशा मनोहर 

पश्चिम द्वारी घेऊन स्वारी 

जरा थांबतो क्षितिजी भास्कर.


करी उजळणी दिवसभराची, 

काय पाहिले,काय राहिले? 

कोण उमलले प्रभात समयी 

अन माध्यान्ही कोण रापले?

 

उन्हे उतरता शीतल वारा 

हळूच देई सायंचाहूल, 

पल्याड डोळे तरी अडखळे, 

बुडताना सवित्याचे पाऊल !


कोण पुसे त्या कितवा दिन हा? 

कोण पुसे अन किती राहिले? 

सापेक्षच हे सारे सारे 

काळ टाकतो संथ पाऊले. 


तटस्थ! पाही पळ दो पळ अन 

होय नाहीसा क्षितिजावरुनी.

औटच घटका राज्य मांडण्या

येते लगबग संध्या राणी.. 


थवे खगांचे मांडून ओळी

परत कोटरी मग जाताना 

निशा खुणावे चांदणगात्री 

चंद्रसाक्षी ने नभ सजताना.

 

राज्य तियेचे स्वप्नसावळे, 

अर्धंतंद्र जगतावर चाले,

जाणीव जाता विरले सारे, 

सुरु जाहले,म्हणता सरले!

 

पहा वाजले घुंगुरवाळे 

प्रभातरवीचे चिमणे पाऊल, 

चक्र संपले,काल कालचे,  

आज, उद्याची, देतो चाहूल!


                                  . 🍃संतोष

संध्या


सोन्याच्या गोळ्याला,केशर बोटे 

तेजाळ चेंडू हा चालला कोठे? 


आकाश तळ्याला,क्षितिज काठ 

संध्या ही उकले,अंधार गाठ.


धड ना दिवस,धड ही रात. 

हळूच सोडवि, दृश्याचा हात. 


कापरासारखा उडाला दिस 

हळूच पालटे धरित्री कूस. 


जळे सायंधूप,निवला ताप,

गारश्या वाऱ्याचे जीवा उ:शाप!


उरला उबारा शांत होई सारा 

उतरला पारा,पाखरां निवारा.


रोजच सोहळा,रोज सायंवेळ

नवाच परंतु रोजचा हा खेळ.


अशाच संध्या ह्या कातर कातर!

 हवीशी हुरहूर! मनाला अत्तर!


                                .🍃संतोष

Wednesday, March 3, 2021

ती ची कथा

एक खाच,वरी काच 

तोच तसा जुना जाच.

वरी संसाराचा नाच

कुशीतून धीमी आंच. 


पापणीला मीठपाणी, 

आत उन ऊन गाणी. 

वाही वारा ही विराणी 

तीच दासी तीच राणी.  


अठ्ठावीस युगे भोग. 

तेव्हा विठूला ह्या जाग, 

थोडी आग थोडा राग 

परी पोटी अनुराग. 


आता हवा हात हाती 

नको सेवा वा आरती 

थोडी प्रीत थोडी गती, 

विश्वासाची अनुमती. 


उंबऱ्याला वाट फुटे, 

आता तिला सीमा कुठे? 

झेपावण्या व्योम थिटे

पोटी भविष्य गोमटे!

काजळ रात

 काळीज कातरे काजळरात 

उरात थरारे श्वासाची वात. 

टाकून सावळी संध्येची कात, 

आली ही नागीण ऐन भरात. 


काळोख शाईत मौनाचा बोरू 

भयार्त भाषा लागते कोरू.

शब्दांना लगाम,थांबला वारू,  

किर्रर्र रातकिडा लागला घोरू. 



झाकल्या पापण्या,

तरी जागा डोळा. 

टिक टिक घड्याळी,

सर्व काटे गोळा.


वाजता पाचोळा,

धीर चोळामोळा, 

जाणीव तळाशी,

नेणीव धांडोळा.


मिथ्याच तरीही स्वप्ने तू सजव.

उद्याचा भाबडा दिवस रुजव.

खेळ हा रात्रीचा रात्रीच निजव, 

भीतीची ही बिळे धृतीत मुजव.


मिटल्या डोळ्यांना पहाटआशा,  

दवांत भिजेल कोवळी भाषा. 

तोवर सावर,भीतीचा वावर, 

निराशा आवर, सरेल निशा.


                                  .🍃संतोष

स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती

 *स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती*


गुलाब पुष्पे कोणासाठी 

हार कुणाला, रोज फुले, 

मार्ग तुझा रे परी काटेरी 

पलाश तुझिया साठी फुले. 


वसंत कोणा कुणास वर्षा 

कुणा गुलाबी शिशिर मिळे 

ग्रीष्म सखा तव,तया सोबती 

अखंड जीवनज्योती जळे.


कबुतर कोठे भिरभिरणारे, 

कुठे पारवळ घुमणारे.  

मोर नाचरे, कुणी पाळले, 

पोपट वटवट करणारे. 


गरुड तुम्ही ते स्थिर गगनींचे, 

विहंग वनीचे,फिरणारे!

घुबड दाविती तुम्हा वाकुल्या 

स्वतः ढोलीतून लपणारे!


कढत अश्रू तव 

सुकती आतच,  

वरती परी चैतन्य फिरे !

पदवी,पदके क्षुद्र तुम्हांस्तव 

क्रांतिवीरा! कैवल्य उरे


                          . 🍃संतोष

वैनायक वृत्त

 *ये मृत्यो ! ये तू ये यावयाप्रती*

*निघालाच असशील जरी ये तरी सुखे.* 


काय आहे हे? काहीतरी अद्भुत लिहिलं आहे एवढं मात्र जाणवतय?  

या आहेत सावरकरांच्या एका कवितेच्या पहिल्या ओळी... 


अक्षरश: हजारो पानांचे सावरकरांचे साहित्य हे विविध लेख,नाटकें,ग्रंथ, कमला आणि गोमांतक यांसारखी खंडकाव्ये आणि इतर स्फुटकाव्य यांनी समृद्ध आहे. 


थोर व्यक्तींना असामान्यत्व किंवा देवत्व प्रदान करून आपली सुटका करून घ्यायची आपली खोड जुनी आहे.

त्यातून अंदमान येथे त्यांनी काव्य कसे रचले, पाठ केले याच्या फक्त कथा आपण ऐकत आलो आहोत.

म्हणूनच त्यांच्याच एका पुढे प्रसिद्धी पावलेल्या कवितेतून त्यांची त्यावेळी काय मनोभूमिका असेल हे जाणून घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.. 

 

तुरुंगात केलेलं काव्य कसं जन्माला आलं असावं याचा तर्क त्यांचं चरित्र वाचताना बांधता येतो. 


आजूबाजूला नैराश्य पसरलेलं,शरीर यातना सहन करत कुपथ्य,अपचन यांना वेळोवेळी बळी पडत असलेलं, 

यावेळी मनातल्या नैराश्यावर मात करण्यासाठी काव्य प्रतिभेचा त्यांनी उपयोग करून घेतला असावा.

शरीरावर तुरुंगाधिकारी ताबा दाखवू शकत होते, 

मन तर मुक्त होतं ना !ते त्यांनी कवितेत गुंतवून टाकलं.


सुरुवातीला अनुष्टुभ सारखा सरळ  छंद त्यांनी कमला या महाकाव्यात वापरला परंतु त्याचे नियम त्यांना सुरुवातीला आठवेनात,ते कुणाकडून मिळतील अशी शक्यताच नव्हती. स्मरण शक्ती ला ताण दिल्यानंतर पुढे ते आठवले. 


मात्र नंतर त्यांनी स्वतःच  स्वतःला अनुकूल होईल असे जे वृत्त निर्माण केले होते त्यात गोमांतक महाकाव्य लिहिलं. त्याचं नाव *वैनायक वृत्त*.


त्यांना तीन वेळेस प्रबळ नैराश्य आले.  (डिप्रेशन).तीनही वेळेस त्यातून

ते इच्छाशक्ती च्या जोरावर बाहेर पडले.त्यातील एका प्रसंगी,शरीर आजाराने,श्रमाने गलितगात्र झालेले असताना त्यांना वाटलं की बहुतेक आता सगळं संपलं.....

आता मृत्यू येणार. 

त्यावेळी तीच चिवट इच्छाशक्ती कवितेच्या रूपात बाहेर पडली. 

तीच ही वैनायक वृत्तातील कविता.      *मरणोन्मुख शय्येवर*

 

वैनायक वृत्त फारसं कुणाला माहिती नसावं. या वृत्तात सावरकरांच्या मूर्ती दुजी ती, वीर बंदा अश्या काही कविता आहेत. 

या वृत्ताचे वैशिष्ट्य असं आहे की ये निर्यमकी, म्हणजे यमक नसलेले म्हणजेच मुक्तछंदी आहे पण मात्रावृत्त असल्यामुळे नियम बद्ध आहे,चालीत  म्हणता येते. 

दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पुढील चरण,  मागील चरण यात अन्वय म्हणजेच सुसंगती आहे. 


हे वृत्त म्हणजे यमक म्हणजे कविता, असं समजणाऱ्या चाकोरीपंडितांना,आणि स्वैर उतारे लिहून त्यांना 'मुक्त छंद कविता' समजणाऱ्या नवकवींना एक धडा आहे असं मला वाटतं.


याचं व्याकरण असं आहे-

गा गा गा, गा गा गा, गा ल गा ल गा.

2  2  2,  2,  2,  2, 2, 1, 2, 1, 2.


थोडक्यात 6, 6 चे दोन आणि पुढे 8 चा एक असे खंड आहेत.


अर्थातच मात्रा वृत्त असल्यामुळे 

मधल्या खंडात, गा गा गा ऐवजी 

गा लल गा, किंवा गा लल लल अशी मोकळीक आहे.


नुसतं व्याकरण कितीही लिहिलं तरी म्हटल्याशिवाय त्याचं आकलन होत नाही,आणि सौंदर्य ही कळत नाही. 

म्हणून, पहिला काही भाग मी म्हणून दाखवला आहे. 


ही दीर्घ कविता आहे. संपूर्ण कविता नेट वर उपलब्ध आहे,शोधून,चालीवर म्हणून पाहायला हरकत नाही.लिंक दिलेली आहे.


हे वृत्त समजून घेण्यासाठी त्याच वृत्तात फक्त उदाहरण म्हणून मी काही सोप्या ओळी रचल्या आहेत त्याही देतोय.

वृत्त कळावं इतकाच उद्देश. 


जा तू जा मेघा जा वर्षण्या पुढे 

तप्त काहिलीच जणू पृथ्वी जाहली. 

शीतलता वाऱ्याची छळून चोरली 

रवीला त्या कैद करी संपुटांबळे. 


उष्ण ओठ धरणीचे विलग जाहले 

धार धरी त्यावरी अन सुखवी कौतुके, 

देई दान जीवन पान रिक्त तृप्त हो,

चाल पुढे वायू सवे,पुढील देशी रे.

----

पुढील देशी,जाशील तरी, विसर ना पडो, 

पुढील वर्षी याच स्थळी ,गाठ तुझी पडो.

( इथं माझ्यातला यमक्या जागा झालाय 😃)


सावरकरांचा अप्रकाशित पैलू उजेडात आणण्यासाठी केलेला हा एक अल्पसा प्रयत्न.


                                  .  🍃संतोष

विनायका !

हे क्रांतिदान दायका, 

विनायका विनायका!


परवशता तमपटला 

छेदण्यास किरणशरे 

निबिड घोर अरिकुहरी 

मृत्युन्जय सूर्य शिरे.


जशी झेप घेई व्याघ्र 

मत्त हत्ती गंडावर,  

अथवा शिव रुद्राचा 

घाव असुर मुंडांवर, 


धाक तसा अभिनव तव, 

शौर्यसुक्त गायका !


विनायका, विनायका !


अंदमान यमकारा, 

भेसूर परिसर सारा

वरी सोशीत अग्निशरा, 

अंतरी तव काव्य झरा.


काली बने सरस्वती !

भारती प्रिय बालका !


विनायका विनायका !



उल्लंघी जलधि जसा 

अगस्तीचा तुम्हा वसा !

स्फुल्लिंगे पसा पसा,  

हाच तुझा अम्हा वसा!


अहि स नकुल ते तव कुल !

भार्गव तप सायका !


विनायका विनायका!


                                  . 🍃संतोष

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...