मेघ सावळा सावळा,
नभा लावतसे लळा,
रंग टाकुनिया निळा,
नभां चढे क्रुष्णकळा!
कसे पुंजावले मेघ
तोय आकंठ पिऊन,
बोट लागता वार्याचे
आले खालती झरून.
मेघ दूतरुपे आला
त्याचा ओलेता निरोप,
गंध पळे रानोमाळ,
गेली वार्ता आपोआप.
जणू अमुर्तसे चित्र,
नभी मेघकुंचल्याचे.
काही आक्रुत्या,आभास,
मू्र्त सजीव झाल्याचे.
छाया क्रुष्णपदराची
आत झरे मेघस्तन्य
पाजी नभ धरतीला
ऐसे वात्सल्य अनन्य.
नाही फिटणारे ऋण,
अनुबंध पुरातन.
द्वैत नभजलदांचे,
धाले एकत्वे न्हाऊन.
.🍃संतोष
No comments:
Post a Comment