श्री गणेश स्तुती
गणु कोणत्या जातीचा?
फक्त पुतळा मातीचा?
गणु पोरगेला पोर?
धीर गंभीर नी थोर?
गणु फक्त रम्य कथा?
परंपरा रुढी प्रथा?
गणु मिष्टार्थी तुंदील?
कलामर्मज्ञ चपल?
गणु पार्वतीचा बाळ?
महाकाळाचाही काळ?
गणु सोवळा ओवळा?
संगे कोणता बा मेळा?
गणु सगुण निर्गुण?
त्याची कैसी बाबा खूण?
साधे सोपे आहे मर्म
तोच गणुचा हा धर्म.
गणु अंतरीचा ठसा
भावभक्तीचा आरसा.
ऐशा गणोबाचे गाणे
शुद्ध धुनांचे तराणे.
मला एवढेच कळे
सुटो तर्कांचे वेटोळे
कशा आव पांडित्याचा
आणि माज चिकित्सेचा?
शुद्ध भाव गणु *साचा*
घोष चिन्मय नामाचा.
धर्म पंथ मते नाना
वाद संपता संपेना.
गणु सापडला ज्यांना
जावे शरण तयांना!
. 🍃 संतोष
हे कालमूषकवाहना!
गजानना गजानना!
कुटीलबुद्धी सर्प पिळुनि
कमरबंद बांधला.
भक्तीमोदक तर्कपरशु
भिन्न जोड सांंधला.
महाकारणदेहधारण दिव्यसुक्ष्मसुलोचना!
गजानना गजानना!
भग्न द्वैत एकदंत
अधममर्दना क्रुतांत
आश्रयास श्रांत क्लांत
अभयदान हरत भ्रांत
रिद्धी सिद्धि चरण चुरत
गण नर्तक न्रुत्य करत
गं गणपती ध्यान धरत
नादब्रह्म प्रणव झरत
जगड्व्याळ जगत जनक जगतजीवजीवना,
गजानना गजानना!
नाममदे मत्त गंड
डुलत, झुलत सरळशुंड.
चित्लक्षी आत्मपिंड
बाह्यात्कारी प्रचंड!
अहंगंड, न्यूनगंड,
क्षरत, करत खंड खंड
रक्तगंधलिप्त अंग रक्तपुष्प पूजना.
गजानना गजानना!
कुंडलिनी जगदंबा
मूलाधार हेरंबा
जाग्रुतदर्शनशोभा
सहस्त्रार रविबिंबा
इडापिंगलेस गांठ
सुषुम्नेस करत वाट
चिदानंद उठत लाट
फुटत ब्रह्म निजपहाट.
राजयोगी योगीराज दुरितकष्टहारणा.
गजानना गजानना!
कली माजे शास्त करी
कलकलाट क्लिष्ट हरी.
सुगमसुखदनाम सरी
वर्षुदेत सकल शिरी.
पुरवीशुद्धबुद्धप्रेम, नुरवीक्षुद्रवासना
गजानना गजानना!
🙏🌺🌸🌺🙏
🕉️
अं *गं* रक्तसुरं *गं*
ज *ग* तापहरण,क्रुतचूर्णविघ्नन *ग*
चर *ण* सुकोमल,अष्टादशदल,परिवेष्टित ग *ण*
अनुता *प* दग्ध मन!स्मरत मंत्रज *प*
अंब *त* नय,करपरशुपाशध्रु *त*
ध्या *ये* त्चित्संतोषे गुणपत *ये*
घ *न* कलौ त्वत्पदे गजान *न*
न *मः* स्खलनं क्ष *मः*
शेवटच्या अक्षरांनी,
आणि सुरुवात करताना, चढत्या व उतरत्या क्रमानी
*ओम गं गणपतये नमः* हा मंत्र गुंफला आहे.
-----------==--------==---------------==------
शिवस्तुती -
शं करोति शंकरः जटाधरः उमावरः
महेंद्र मोक्षकारणं मनोहरः महेश्वरः
अनादिमूलकारणं दिगंबरः दयाकर:
त्रिभंगशूलधारणं विशुद्धचंद्रशेखरः
शंकरः शुभंकरः शिरं शशांशशोभनं
गिरीसुतावरं प्रपंचपातकप्रभंजनं
भं ध्वनी भयंकर: अनंगअंग भर्जनं
डं निनाद नादने अनाहतस्य गर्जनं
कंठनाल नील, धीर, कालकूटप्राशनं
सुषुप्तीलीनलोचनं हिमाद्रितुंगवासिनं
स्फुरत्भुजांगभीषणंभुजंगमालभूषणं
प्रसन्नचित्तचंदनं, प्रमादभस्म, लेपनं
षडाक्षरीत्वदीयनाममंत्रघोषघोषणं
षडारिषण्मुखप्रियःत्वमेवचित्तपोषणं
आमोदबोधबोधनं समाधीसौख्यसेवनं
प्रमोददायकं प्रचंडविश्वनाट्यखेलनं
आत्मलिंगरूपशुद्धवेदसारमंथितं
अनात्मभेदलोपकं,सदार्यकार्यसंस्थितं
कलीमलविमोचनात्त्वमाश्रये पिपासितः
दयाब्धिदीनबांधवः पदौविलीनईप्सित:
अहं न पंडितं कवी,त्वदियदीनबालकं
क्रुपादयानिधिश्वरः त्वमेवशब्दचालकं
. 🙏 🌼🌼🌼🙏.
*गुरुकरुणाष्टक*
व्रुत्त:-शिखरिणी.
गुरूमाऊलीये,झडकरि अतां मार्ग सुचवी.
धरीला तो ग्राहे, गजपद तसे मानस भवी.।।धृ।।
सुखाच्या आभासे विषय विष या पंचविवरी,
त्यजाया ना शक्ती भुरळ पडता सेवन करी।
सुमार्गामाजी या षडरि बनती त्रासद किती,
सुमामाजी जैसे अलिदल बळे आंत रिघती.।१।
धरी मालाहाती सरकत पुढे फक्त मणी हे,
मनी नाही मूर्ती अधिर स्मरते मेरुमणी हे।
न्रुपाच्या धाकाने उगिच पुढती भाट फिरती,
जपाच्या सोंगाने पुटपुट तसे ओठ करती।२।
श्रमाया ना लाजे खडतर जरी भोग पूर्ती,
रमावेसे वाटे बहुविध खुळे खेळ भवती।
कधी काही बोधे उपरतिमनी होऊ पाहे,
पुन्हां जाते मागे घसरुनपडे,त्रासताहे।३।
नदीच्या काठाने अलगदपणे जात असता,
रूते कोणी तेथे दलदल जिथे पाय फसता।
तया ना सामर्थ्ये निजबळबळे होत तरणे,
त्रयस्थाच्यासाठी हतबलपणे वाट बघणे।४।
तसे या संसारी तुजविण कुणा हाल दिसती?
उगा कोणी काही दुरुन भलते प्रश्न पुसती।
त्वरे हाता द्यावे उचलुनि वरी घेई मजला,
अहंता मारावी तवशुभपदी जीव निजला।५।
सुखाने भोगांना कवळुन कसा पूर्वी बसलो,
पुन्हा येणे जाणे,जननमरणी पूर्ण फसलो।
कुणासाठी गाठी,वहन करु मी पूर्ण थकलो,
तुझी सेवा गांठी,भवजल,तरी पूर्ण सुकलो।६।
क्रुतक्-कोपे माता नयनफुलवी रागीट पणे,
परी हे तो प्रेमे!सुलभ पुढती मार्ग दिसणे।
तशी येती विघ्ने अवचित इथे,भ्रांत नसतो,
तुझ्यापायीसारे!अडचण जरी शांत असतो।७।
पुरे आता झोका सदयबनुनी स्थीर करवी,
सुखा,दुःखा पाठी ढकलत पुढे श्रेय नुरवी।
असो दे ही वाचा,सतततुझिया गुंग स्मरणी,
झिजो दे ही काया,कलिमलहरी,लीन चरणी।८।
🌼🌸🌺🙏🌺🌸🌼
.🍃संतोष
श्री ज्ञानदेव
नूर भी शर्म से,
कुछ फिका सा
इनके आगे,
ये है श्री ज्ञानदेव,
रुख़ करे,
मुक्ती आगे।
विठ्ठल
इश्क-ए-हकी़की़ मे,
हर इक सूबा जहां
डूबा रहा!
ये है विठ्ठल,
उसीके नाम मे,
ये अजूबा रहा।
.🍃संतोष
No comments:
Post a Comment