Monday, May 19, 2025

 नमन मम तव प्रति,...गणपती!

गजानन, हे हेरंब..।ध्रु।


झुणझुणझुण नुपुरनाद।

थिरकतद्वय चपलपाद।

घुणघुणघुण प्रणवनाद।

भक्ती सुरस तव प्रसाद।


मूलाधार, मुळारंभ....।१।


सूक्ष्मद्रुष्टी विचक्षण।

वक्रतुंड रक्तवर्ण।

उदरगुरू शूर्पकर्ण।

करित दुरित विघ्न चूर्ण।


आत्मरूप पूर्णबिंब....।२।


तवप्रकाश,होय प्रकट।

सोम,भौम,रवीही फिकट।

वितळत भव घन तमपट।

क्षीण क्षणिक रजखटपट।


नित्यमुक्त प्रेमकुंभ...।३।


नमन मम तव प्रति।....गणपती!


                                 .🍃संतोष

लता दीदी

 सप्तसूरांच्या आम्रतरुंची 

बने पोरकी,

तालही होई खुळाबावळा,

गुंजन विरले गंधाराचे,

*उडोन गेली आज कोकिळा।*


शतकांमाजी असे कुणीतरी

रसिकजनांच्या साठी येते.

बघता बघता आयुष्याचा

अतूट हिस्सा बनून जाते.


ओळख माझी,स्वर हे माझे

सांगून गेली जी कळिकाळा,

नाद गुंजतो घुंगुरवाळा,

*उडोन गेली आज कोकिळा।*


स्वर जे झरले,अम्रुत झाले.

कान नव्हे,हे प्राण पोसले।

अजून घुमतो मनगाभारा

दिपकळ्यासम सूर तेवले।


स्वरसाम्राज्ञी तुझिया दारी

श्रुतीपुष्पांचा फुले मळा।

अमरचि हा राहील गळा,

*उडोनी गेली जरी कोकिळा।*


          🙏🙏🙏



                                   .🍃संतोष

पाहुणा गोजिरा

 पाहुणा गोजिरा|जीवीचा जिवलग|

ठेवतो सजग| सर्वकाळ||


येई नित्यनेमे|क्षेम देई प्रेमे|

वासना ही शमे|पायी त्याच्या||


कष्ट करि नष्ट|आणि भेद भ्रष्ट|

दुर्गुण हे दुष्ट|घालवितो||


काळमूषकाचा|स्वामी हाच साचा|

सकल सुखांचा|सत्य दाता||


कैसेनि म्हणावे|याला पाहुणा मी?|

सदा अंतर्यामी| सर्वांच्या हा||


उत्सवाकारणे|करी येणे जाणे|

प्रेम देणे घेणे|भक्तांसवे||


एरव्ही हा नित्य|नामसंकीर्तनी|

रमतो भजनी|भाविकांच्या||


द्यावी शुद्ध बुद्धी|नको रिद्धी सिद्धी|

व्हावी भावव्रुद्धी|दिसोदिस||

मेघाचे जांभूळ

 मेघाचे जांभूळ टचकन फुटले,

मोहोळ उठले काळेनिळे.


पिसाट गोंगाट,वार्याचा बेफाट

भरून सांडले नभतळे.


विजेचा हा लोळ,उठला कल्लोळ

सुटले वादळ वेडे खुळे.


थेंबांची झुंबरे हालती डुलती

मौक्तिकांची सर खाली पळे


टपोर थेंबात मिसळे कस्तुरी,

वाहतो सु्वास वायूबळे


नेमाने, प्रेमाने नाचतो पर्जन्य

कित्येक युगे हा कोणा कळे?


मनाची तनाची शांत हो काहीली

त्रुप्ततेचे दान जीवा मिळे.

प्रकाशप्राशी पक्षी

 तेजाळ दिव्याच्या खाली मी प्रकाशप्राशी पक्षी.

मांगल्यमनोहर मार्गी लखलखती सुंदर नक्षी


चंचूच्या पात्री माझ्या रस अर्काचा उतरावा.

पाचूच्या हिरव्या रानी मग माझा व्हावा रावा


कोंदणात झगमगणार्या मोत्यांचे नयनीं पाणी

कंठात कोकीळेच्या जी तैसीच वैखरी वाणी


मी विहंग वनीचा होता,वायूचे पंख फुटावे

नेत्रांत निळ्या निलिमेचे नितनूतन चित्र नटावे


प्राजक्त पहाटेचा जो तैसाच सुवास सुटावा

लवलवत्या पात्यांजैसा स्रुजनाचा कोंब फुटावा


मग व्हावे सोज्ज्वळ गान भक्ती चे अम्रुतपान

त्रुप्तीची विहरो तान क्षणभर विसरू दे भान


सणसोहळाच हो नित्य, सर सौख्याची वरुषावी

ह्रुदयाची घुमता विणा,मग चित्तव्रुत्ती हरुषावी


                                🍃.संतोष

कोजागिरी

 कोजागिरी ची आज पौर्णिमा

मनात चांदणजाई फुले.

फिकट कौमुदीप्रभा मिसळली

पूर्णचंद्र हा मधे डुले.


को जागर्ति इति वदतसे

विष्णुप्रिया रजनी समयी.

क्रुपाद्रुष्टीने न्याहाळून ती

मग आपुल्या सदनी जाई.


आटीव गोरस घालून केशर 

जायफळा किंचीतसा अवसर,

शीतल शशीचे शुभ्रधवल कर

त्यात उतरता प्राशु सत्वर


शरदऋतुचे रुप देखणे

आज निरखूया स्वस्थ पणे

नीरव शांतता त्यात वितळता

सुखालागी मग काय उणे.

 म्हणणं तरी काय तुझं सांग बरं पावसा?

अजून का रे पडतो आहेस यंदा रात्रंदिवसा?


वाहून वाहून तुला झाले मेघही बिचारे

शरद,आश्विन मास गेले विसरून सारे तारे!


माळ्यावरचे रेनकोट,टोप्या आल्या पुन्हां खाली.

मोडक्या तोडक्या छत्र्यांच्याही झाल्या आता ढाली.


गेलास म्हणता येतोस पुन्हा जायचं नाव नाही.

केविलवाणा पावशा पक्षी तोंड चुकवत जाई.


कविता तरी करु कशी लेखणी हातात धरु?

सांगणं तुझं संपत नाही संततधार सुरु.


पाणथळलेले रस्ते सगळेजिकडे तिकडे ओल.

आडोश्याच्या पत्र्यांवरही विनाकारण ढोल.


आता मात्र आळीमिळी,घे मौनाचा वसा!

राहून गेलं पुढील वर्षी बोल बरं कसा!


                                   .🍃संतोष

अटलबिहारी वाजपेयी

 राजकीय पटल पर अटल नाम अटल,

स्वर्णिम सी प्रतिमा है अचल अचल अचल।


जन्मभूमी ग्वालियर,लखनऊ थी कर्मभूमी,

भारत के जो सपूत,अविचल थे राष्ट्रप्रेमी।


कवी थे,थे वक्ता भी,पत्रकार कुशल।


राजकीय पटल पर अटल नाम अटल।।


म्रुदुल मन के वो कवी थे पर शोले भी बरसे,

आपत्काल मे सब जब स्वतंत्रता को तरसे।

भारतीय संसद जो परिचित थी जिस स्वर से,

यूनो की आमसभा गूंज उठी उस स्वर से।


हिंदी की गरिमा,उज्ज्वल हर पल पल।

राजकीय पटल पर अटल नाम अटल।


स्मितहास्य सरल ह्रदय,विरोधी भी मित्र बने,

प्रधानमंत्री रुप मे विश्व से अनुबंध बुने।


अणु का विस्फोट किया जगत गया मचल,

राजकीय पटल पर अटल नाम अटल।


झिलमिलते तारोंमे सूरजकी वो प्रभा

जगमगाते जुगनूओंमे चंद्रमाकी वो आभा

सागर मे दिपस्तंभ मेरू गगन को चुभा

भ्रुंग जो की राष्ट्रभक्तीकमलदल पे नित लुभा

नवभारत याद रखे स्म्रुती ना हो विरल।


राजकीय पटल पर अटल नाम अटल।

स्वर्णिम सी प्रतिमा है अचल अचल अचल


                              .🍃संतोष

तिरंगा

 नभ मे जो फहरत है,शान और मान से

भारत के ध्वज को नित प्यार करे जान से


चौहत्तर सालोंमे गौरवक्षण साथ जुडे

हर चौखट,हर पनघट मिलकर ही आज बढे.


संकट कीं घडीयोंमे ना ही झुके और रुके

हर पतझड देख चुके,फुल चुने हर बन के.


आँधीसे नही डरे तुफाँमे डँटे रहे,

संगर से घिरकरभी,सर्जन मे जुँटे रहे.


बोलियाँ,है लिपियाँ,है बहोत से वेष भी

उत्सव है पर्व है ,थोडे है क्लेश भी.


मुश्कील है राह मगर,ठानी है सोच बडी,

है उमंग और जोश,अर्थक्रांती पास खडी.


आशा से भरे हुए,सपनोंके पंख लिये, 

कई करोड नयनोंके प्रज्वलित आज दिये.


दुनिया को दिखलाये हमसा अब नूर नहीं

पायेंगे हम मंझील अब मुकाम दूर नहीं

Wandering boy

 On wet road 

in drizzling rain

Wandering boy looks

happy again.


Opens up an umbrella

goes for walk,

Parked his cruz in

Farthest Dock.


Road not so broad,

road not so wide

Nothing like an ocean

With whirling tide.


Not so lonely with

Whispering wind,

fog kissed air and moistened mind.

Monsoon

Hanging lamp,

some mist and dew..

A cup of tea and 

monsoon view.


Wiping off all

old summer signs

Cold fresh Breeze 

comes,hugs and joins.


Fragrance filled in 

all ambience

Welcome *Dear Rain*,

Present your dance..


                      .🍃 Santosh

शि.द. आजोबा

 नवलाख कल्पना

झरती होऊन मेघ..

ती जाड ठशाची 

सुबक देखणी रेघ 


चिरतारुण्याचे 

रेषांना वरदान

हा नव्हे कुंचला 

सरस्वती चे स्थान 


नच झाले ऐसे

व्यंगचित्र अव्यंग

ना स्पर्श कुठेही

विरुपाचा तो संग


कुणी मुग्ध बाल हा 

समजावे आईला

अन् देतो खाऊ

पाहून गायनलीला.


किती चित्रकथा या

उलगडती स्मृतीपटली

ही कशी गॅलरी

कल्पकतेने नटली.


ह्या अमीट रेषा 

ओठांवरती फुलती

अन् देत प्रेरणा

नवप्रतिभा उमलवती 


हे हात देखणे

तशाच तुमच्या रेषा

त्यां प्रणाम अमुचा

शतायुषी उन्मेषा..


                .🍃 संतोष

बरखा

 मूळ रचना - पं.कुमार गंधर्व


ऐसन कैसन बरसत बरखा


घिरी घिरी आइ छाय दिस चहुँवा


अंतरा


बहु दिन ते छिप गयो सूरजवा


ऊब रे गइ बरसन ते मनवा


स्वैर अनुवाद -

अश्या कश्या बरसत या धारा

घेरून दाही दिशा बघ साऱ्या...


बहु दिन तो रवि दडुनि बसला 

उबला जीव रे! संततधारा!!

                          .🍃 संतोष

घन वरुषावा

 घन वरुषावा, घन वरुषावा,

अन् पुन्हा ऋतू मनी हरुषावा 


या रुक्ष कोरड्या जगण्याला

लवलवता नव अंकुर यावा..

घन वरुषावा....


पाऊसधारा,भिजला वारा

ते गीत जुने फिरुनी गाती

हा राग जुना पण उपज नवी

तो गुणगुणती हिरवी पाती.


तो रंग सावळा विरघळूनी

जनमनांत श्रावण बहरावा 

घन वरुषावा....


ही तहानलेली मनहरणे

पळतात मृगजळा पाहोनी..

त्यां भरकटल्या वाटांवरती

हो नितळ जळाचा शिडकावा..

घन वरूषावा...


हे जग लहरी,ना तू सखया..

ऋतू येता येशी नेमाने...

ही तप्त उन्हे अन तप्त मने

त्यां उरी भेटशी प्रेमाने.


ही ओसंडून वाहे सरिता

अन् वाटा उदरी घेताहे,

तो बोल तुला का लावू मी

करतो मानव ते भरताहे.


तू युगायुगांचा रहिवाशी

तुज कसा पाहुणा म्हणवावे ..

हे चक्र फिरे,परि दान उरे,

ते तृप्त मनाने वेचावे.


तू जलदाता, जीवनदाता

तो प्रेमळ कर शिरी असू द्यावा.

घन वरुषावा...

                     .🍃 संतोष

आम्ही कोण

 आम्ही कोण म्हणोन काय पुसता,

आम्ही जगा दोडके..

होते छत्र,तुरे शिरी जिथे,

आता असे बोडके..


गेले विक्रमनृप,वीर गळले, 

हाती आता बांगड्या

पिंका टाकीत,चौक फक्त भरुया

बाता उगी रांगड्या.


गेला काबूल,सिंध प्रांत अवघा

त्याला युगे लोटली.

गेले काश्मिर,केरळी कुणी नसे

सत्ता कुणी घोटली?


कसले विश्वगुरुत्व,येथ अपुले

शिष्यत्व ही लोपले

झेंडे फक्त इथे तिथे फडकती

आचार्यही झोपले.


अपुले छान पवित्र पुज्य सगळे

'खुळचट रूढी ' मानुया..

गीता,स्तोत्र नको,सण नको 

बुद्धी चला ताणुया.


चोलांच्या अन् रम्य पूर्वसुरीच्या

गप्पा चला मारुया

हसतो तेथ मलेशिया,सर्व 

आशिया ,बंगालही हारुया..


हे झगडे नव्हेत फक्त वरचे

काफिर नको याजला

गेले ' पाक नबी ',असेल वरती

मुहम्मद ही वैतागला.


आम्हां काय कधीच त्याज्य नव्हते 

साधू सूफी अन् वली...

पण हा मुर्ख जमाव यांस असते

धर्मांध बिरुदावली..


घर अपुले जपण्या,हवी पुन्हा

वेदोद्भवी संस्कृती...

हाती शास्त्र तसेच शस्त्र असूदे

फैलावली विकृती...


                     .🍃 संतोष

मंगलमूर्ती

 अनादि तत्वा,हे निजसत्वा

प्राणप्रतिष्ठा कशी करु?

भरुनी सारे दिगंत उरशी

हाती तुजला कसा धरु?


ओंकाराचे नित आवर्तन

तिथे आरती कशी गावी?

ब्रह्मरसाचे सुटता पाझर,

पक्वान्ने कशी अर्पावी?


जळी स्थळी तू व्यापुन असशी

कोण विसर्जन करु शके?

मुळारंभ तू व्योमप्रकाशी

तर्क, कल्पना,मती थके.


तुझ्या कृपेने उत्सव घडतो

ना तर सारे देखावे 

ज्याचे त्याला ठावे मानस

कुणी कुणाला जोखावे?


अगा निर्गुणा येशी बनुनी

सगुणाची सुंदर मुर्ती..

म्हणुनि धजतो करण्या पुजा

गजवदना मंगलमुर्ती.

            🙏

                             . 🍃संतोष

 *वही बारिश नयी बाते..*


अंदर तक खिडकी के भितर

बारिश की कुछ बुंदे आयी..

पहले बरसातों में भिगी यादे

मनमें फिर मुसकायी.


बंद करो खिडकी दरवाजे 

कुछ आवाजे दोहरायी पर..

रोक सकी ना उन बुंदोंकी

छनक चौखंटोनेभी सुनायी


बारिश लायी कुछ भीगापन 

नई उमंगे कुछ ताजापन.

बंजर धरती पे हरियाली

सख्त निगाहोमे अपनापन.


गर्म चाय की प्याली लेकर 

कुछ बातें बुंदोसे करना

बारिश तो आती जाती हैं

तुम कब महकोगे फिर वरना..


भिगा आंचल सहमी सांसे 

वर्तमान मे ना आयेगी.

बंद घरोंमे बरसातोंकी

खुशबू अब ना फिर छायेगी.


जितनी जैसी मिले वो बारिश

पी ले नो दो ओर पिलाओ

सतरंगी कुछ सपनोसे फिर

खुलके अपनी नजर मिलाओ.


                           .🍃 संतोष

दसरा

 दुःख निराशा सारी विसरा

पंख नवोन्मेषाचे पसरा

चेहरा ठेवा सदैव हसरा

सण वर्षाचा आला दसरा


मिष्टान्नांनी सजू द्या पाने

लुटा आपटा शमीची पाने

मंजुळ मंगल आळवा गाने

ह्रदय भरो निर्मळ हर्षाने


सुह्रुदांचाही जमेल मेळा

भावक्षणांची पंचीम खेळा.

पूर्ण मुहुर्ती येतो तिसरा,

सण वर्षाचा आला दसरा.


सोन्यासम तुम्ही रहा म्हणावे

सोने घ्यावे सोने द्यावे.

शुभ चिंतावे शुभ बोलावे

नववस्त्रांनी शोभित व्हावे.


अमंगळाचा रावण जळूदे

कुवासनांचे विघ्न टळूदे

सुविचारांचे दान मिळूदे,

दंभयुक्त जे मीपण गळूदे.


दिपावलीचे वेध लागतील,

आठवणींचे दीप जागतील.

उत्सव ऐसा नाही दुसरा

सण वर्षाचा आला दसरा.


                         .🍃संतोष

भाकरी चा चंद्र

 चतकोर चंद्र आणि 

चांदण्या या एक दोन


कवितेच्या पानावर

आणि असणार कोण?


चतकोर चंद्र,तोही

हळू हळू झुरे,विरे


एका काळरात्री त्याचा

काही मागमूस नुरे


ऊतू गेल्या चांदण्यांत

नभ होई वेडेपिसे,


पूर्ण चंद्रबिंब त्याला

मनातल्या मनी दिसे.


मग पुन्हा चंद्रकोर

रात येई गिरवित 


कले कलेने आकाश

पुन्हा चंद्र मिरवित.


दूर चंद्रमौळी घर

खेळे थंडगार हवा


दोन गारठले देह

आणि विझू विझू दिवा.


पोटातील अवसेला 

भाकरीचा चंद्र हवा.


नको कोरडा श्रुंगार,

नको चांदण्यांचा थवा.

          

झाकीर हुसेन

 ताल महर्षी झोपला

उरी होतसे आघात

असा पुन्हा नाही होणे

'काल'जयी सिद्ध हात..

शेज करुनिया 'साज'

जरी झोपलेला 'ताज'

वाजे कानात मनात

धुंद तबल्याची गाज..


बाया दाया दोहों बाजू

मधे ताल अनाघात

सम चिरविश्रांती ची

कशी आली अकस्मात?

आर्त मात्रांचे चलन

आता 'बोल' होती मुके

'भरी' 'खालीं 'चे वजन 

आता कोण पेलू शके?


किती झाले,होतीलही

परि ऐसा नाही होणे..

वीज बोटांत तरीही

त्यांना रेशमाचे लेणे..

अरे नियंत्या तू नेले,

जरी मैफिलीत दूर

इथे त्यांनी पेरलेले 

लक्ष,जगात 'झाकिर'‌..

                       .🍃 संतोष

प्रवासपक्षी

 Pitch-dark scarry sky

like deep heavy sigh..

Little traveling birds

Still never stop but fly...


When morning 

Offers dew.. 

rays are tender and few,

Little traveling birds

Make queue

and continue...


Cold Breeze,

storm or rain.

Tired wings,fatigue 'n pain,

Little traveling birds

would never break

the chain.


Scorching sun on the head

Not thinnest green shade..

Little traveling birds

Still marching ahead.


Though hearts feel so dry..

Expectations rise High..

Little traveling minds

Should never stop but try...


When things fall in place

Life gains sweetest pace

Little traveling minds

Should hold hands with the grace..


                    .🍃 Santosh


गहन घोर काळोख्या राती

विझलेल्या आशेच्या वाती

तरी चिमुकले प्रवासपक्षी

नव्या दिशांचे गाणे गाती..


वारा,गारा, पाऊसधारा

शीण, वेदना अन् सुस्कारा

तरी चिमुकले प्रवासपक्षी

पुढे धावती शोधित तारा..


सुर्य भडकला डोईवरती

नसे विरळही छाया भवती 

तरी चिमुकले प्रवासपक्षी

पुढे चालले मार्गावरती..


किरण कोवळे मुख उजळवती

सवे दवांचे मोती रुळती,

तरी चिमुकले प्रवासपक्षी

अथक प्रवाशी मुळी न चळती..


हृदयांमधले भावच आटले 

अन् तृष्णेचे बांधच फुटले

तरी चिमुकले जीवनपक्षी

भिडती पुढती कधी न हटले.


मनासारखी स्वप्ने फुलती 

गज सौख्याचे दारी झुलती..

तरी चिमुकले जीवनपक्षी

गळ्यात घालून गळे चालती..


                            .🍃 संतोष

 आसमानके तारे देखे,

उजले दूर किनारे देखे

रिमझिम बारिश की बौछारे,

कभी मेघ भी प्यारे देखे.


धूप की नर्मी,कभी सुबह की

कभी शामके साये देखे

दूर गगन मे उडते पंछी

पेडो़ंपर फिर आये देखे


पवन के झोके,डाल से बाते

करके फिर इतराते देखे,

पपीहे  कोयल गुमसुम बैठे

बदले ऋत मे गाते देखे.


चट्टानोंसे बाते करते

झरनो के फौवारे देखे

धुंदले परबत,नभ मे छिपते

नदिया,घाटी सारे देखे


झील मे उतरे चांदसितारे

धीरे से लहराते देखे 

पीपल के पत्तोंके झंडे 

डाल डाल फहराते देखे.


सर्दीके मौसम मे रुठे

फुल पुनः मुसकाते देखे

मुसकाते कोमल फुलोंपे 

भंवरे फिर मंडराते देखे


सबकुछ देखा नीले सपने

पंछी बन उड आते देखे

फिरसे मनको सभी दिशाये

शुभसंकेत दिखाते देखे.


                        .🍃 संतोष

ऑपरेशन सिंदूर

 खणखणली शस्त्रास्त्रे,

दणदणली भूमी.

कडकडले नभ सारे,

व्याकुळले व्योमी


जय राष्ट्रा,नवराष्ट्रा ,शक्ती समर्था

दिङमूढ झाली पृथ्वी

 पाहून पुरुषार्था.....


कुश्चळ काळी कृत्ये 

आता चळणार.

त्यांना जागा त्यांची 

आता कळणार 

लपवून तोंडे दुर्मुख 

आता पळणार 

त्यांचे चांद सितारे 

आता ढळणार .


जय राष्ट्रा,नवराष्ट्रा ,शक्ती समर्था

दिङमूढ झाली पृथ्वी

पाहून पुरुषार्था.....


सुसज्ज भूदल नौदल अन् वायुसेना 

अचूक पडता अस्त्रे 

शत्रूची दैना 

कणखर नेतृत्वे ते 

कोणा ऐकेना

पडघम उठले जगती 

*जय हिंद* की सेना


जय राष्ट्रा,नवराष्ट्रा ,शक्ती समर्था

दिङमूढ झाली पृथ्वी

पाहून पुरुषार्था.....


सिंदूर भाळीचा ना 

आता पुसणार 

करता आगळीक आणि 

आता घुसणार 

कोटी जनता सारी 

सौख्ये हसणार 

आता नाही कोणी 

अश्रू पुसणार


जय राष्ट्रा,नवराष्ट्रा ,शक्ती समर्था

दिङमूढ झाली पृथ्वी

पाहून पुरुषार्था.....


म्हणोत कुणी आम्ही 

मध्यस्थी केली 

घाबरला शेजारी 

अन् संधी केली 

जगात अवघ्या त्याची 

नाचक्की झाली 

हिरवी पिल्ले आश्रित 

धास्तावून गेली


जय राष्ट्रा,नवराष्ट्रा ,शक्ती समर्था

दिङमूढ झाली पृथ्वी

पाहून पुरुषार्था.....


आक्रामक सेना ही 

ओळख राहू दे 

निर्भय राष्ट्रा क्षितीजी 

कुंकुम पाहूदे 

सुक्ते नवशक्तीची 

जनता गाऊ दे 

अवघे काश्मीर आता 

अमुचे होऊ दे


जय राष्ट्रा,नवराष्ट्रा ,शक्ती समर्था

दिङमूढ झाली पृथ्वी

पाहून पुरुषार्था.....


                             .🍃 संतोष

एकांत

 एकांताच्या वाटांवरती 

कधी निळाई आणि हिरवळ..

कधी शून्य शब्दांची मैफील

आठवणींचा दुरुन दरवळ.


कधी स्वप्नचंद्रांच्या पुनवा

कधी मंदसा एक काजवा

कधी नव्या आशेचा रुजवा

सुखदुःखाचा कधी ताजवा .


कधी बाभळी माळावरची

अन् छाया त्या निवडुंगाची.

कधी हासरी जुई सायली

पायी मखमल प्राजक्ताची.


कधी गच्च मेघांच्या खाली 

फक्त उकाडा पाऊस नाही.

कधी धुंद धारांचे नर्तन,

मनी गारवा पेरत जाई.


वेळ स्वतःला पारखण्याची

स्वयं प्रकाशे लुकलुकण्याची.

विलंबित तालातील बंदीश

स्वतः स्वतःशी गुणगुणण्याची.


देऊन जाते बरेच काही,

थोडी आशा फुलण्यासाठी 

घेउन जाते वचने काही

पुन्हा नव्याने लढण्यासाठी .


                      .🍃 संतोष

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...